ETV Bharat / city

खळबळजनक! दादरा व नगर-हवेलीचे खासदार मोहन देलकर यांची आत्महत्या? - mp mohan delkar

दादरा नगर-हवेलीचे खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील ग्रीन सी हॉटेलमध्ये पोलिसांना आढळला आहे.

खळबळजनक! दादरा व नगर-हवेलीचे खासदार मोहन देलकर यांची आत्महत्या

author img

By

Published : Feb 22, 2021, 3:52 PM IST

Updated : Feb 22, 2021, 5:24 PM IST

मुंबई : दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये आढळला आहे. गुजराती भाषेतील सुसाईड नोट त्यांच्या मृतदेहाजवळ सापडली आहे. यावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

दादरा व नगर-हवेलीचे खासदार मोहन देलकर यांची आत्महत्या?

दादरा व नगर-हवेलीचे खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील ग्रीन सी हॉटेलमध्ये पोलिसांना आढळला आहे. मोहन देलकर यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मृतदेहाजवळ आढळली आहे.

घटनास्थळावरून ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा

कोण आहेत मोहन देलकर?
58 वर्षीय मोहन देलकर हे दादरा व नगर-हवेली लोकसभा मतदारसंघातून 1989 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. याबरोबरच भारतीय नवशक्ती पार्टीच्या माध्यमातूनही ते खासदार म्हणून निवडून आले होते. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र 2019 च्या निवडणुकीत पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवून ते विजयी झाले होते.

Last Updated : Feb 22, 2021, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.