मुंबई - लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलेल्या निषेधार्थ आज (सोमवारी) महाराष्ट्रात बंद पाळण्यात येतो आहे. भाजप मनसे वगळता सर्वच राजकीय पक्षांनी बंदच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अनेक संघटना संस्था कामगार युनियन या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. दादर परिसरातही या बंदचे चित्र पाहायला मिळत आहे. दादर पश्चिमेकडील भागात नेहमीच खरेदी विक्री दरांची मोठी वर्दळ असते मध्यवर्ती ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात येथे रेलचेल सुरू असते. मात्र आज बंद असल्यामुळे सर्वत्र दुकान बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
नाक्यानाक्यावर पोलिसां कडून गस्ती घालण्यात येत आहे दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो येथे सेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेने बंदला पाठिंबा दर्शवला असून याचे चित्र संपूर्ण दादर परिसरात दिसून येत आहे. आमचे प्रतिनिधी काशिनाथ म्हादे यांनी घेतलेला हा आढावा..
लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलेल्या निषेधार्थ महाराष्ट्रात बंद पाळण्यात येतो आहे. भाजप मनसे वगळता सर्वच राजकीय पक्षांनी बंदच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अनेक संघटना संस्था कामगार युनियन या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. दादर परिसरातही या बंदचे चित्र पाहायला मिळत आहे. दादर पश्चिमेकडील भागात नेहमीच खरेदी विक्री दरांची मोठी वर्दळ असते मध्यवर्ती ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात येथे रेलचेल सुरू असते. मात्र आज बंद असल्यामुळे सर्वत्र दुकान बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कठोर बंदोबस्त ठेवला आहे. नाक्यानाक्यावर पोलिसां कडून गस्ती घालण्यात येत आहे दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो येथे सेनेचे वर्चस्व आहे शिवसेनेने बंदला पाठिंबा दर्शवला असून याचे चित्र संपूर्ण दादर परिसरात दिसून येत आहे. आमचे प्रतिनिधी काशिनाथ म्हादे यांनी घेतलेला हा आढावा
हेही वाचा -Jammu-Kashmir: अनंतनागमध्ये सुरक्षा दलासोबत चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान, शोधमोहीम सुरू
हेही वाचा - मोदीजी जगभर फिरतात, मात्र शेतकऱ्यांसाठी दिल्ली बॉर्डरपर्यंतही जात नाहीत; प्रियंका वाराणसीत गरजल्या