ETV Bharat / city

Cyrus Mistry funeral : सायरस मिस्त्रींवर मंगळवारी वरळीतील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार - वरळीतील स्मशानभूमी सायरस मिस्त्रींवर अंत्यसंस्कार

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या Former Tata Sons Chairman Cyrus Mistry funeral Worli Mumbai मंगळवारी वरळीतील स्मशानभूमीत Worli Crematorium सकाळी 10 च्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहे. काल रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

Cyrus Mistry funeral
Cyrus Mistry funeral
author img

By

Published : Sep 5, 2022, 1:22 PM IST

Updated : Sep 5, 2022, 1:35 PM IST

मुंबई - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा Former Tata Sons Chairman Cyrus Mistry funeral Worli Mumbai रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. काल रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरस यांच्या कुटुंबातील एकही सदस्य सकाळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही. सायरस यांचे कुटुंब परदेशात असल्याने ते आज रात्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. सायरस यांच्यावर उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कुटुंबीय परदेशात : सायरस मिस्त्री यांचा मुलगा आणि पत्नी फॅमिली फंक्शनसाठी यूकेमध्ये आहेत. आज म्हणजेच सोमवारी ते मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. या वर्षी 28 जून रोजी सायरसचे वडील आणि बिझनेस टायकून पल्लोनजी मिस्त्री (93) यांचेही निधन झाले.

कसा झाला मृत्य? : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. या घटनेत कार चालकासह अन्य दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. अहमदाबादहून मुंबईला जात होते. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनायता पांडोळे या भरधाव वेगाने वाहन चालवत होत्या. त्यांनी चुकीच्या दिशेने (डावीकडून) दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पती, जेएम फायनान्शियलचे सीईओ डॅरियस पांडोले हे त्यांच्या शेजारी बसले होते.

कारची फॉरेन्सिक तपासणी : अपघात झालेल्या कारची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. यावरून अपघाताचे खरे कारण काय आहे हे समोर येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता आणि त्याच्या गाडीतही कॅमेरा नव्हता. रस्त्याची अवस्थाही चांगली होती. अशा परिस्थितीत आता चूक कुठे झाली याचा शोध घेतला जात आहे.

डॉ. अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोलेंना आणले मुंबईत : सायरस मिस्त्रीसोबत प्रवास करणाऱ्या डॉ. अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोले यांना आज सोमवारी रस्त्याने मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात आणण्यात आले. 20 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचारासाठी सज्ज आहे, अशी माहिती एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे सीईओ डॉ तरंग ग्यानचंदानी यांनी दिली आहे.

हेही वाचा - Cyrus Mistri Accidental Death : भारतात सीट बेल्ट लावण्याकडे दुर्लक्ष; तुम्ही देखील सीटबेल्ट वापरा अन्याथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

Last Updated : Sep 5, 2022, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.