मुंबई टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे पालघरमधील चिरोटी येथे कार अपघातात दुर्दैवी निधन (Accidental Death) झाले. मिस्त्री यांनी आपला व्यापार अनेक देशांत पसरवला असून त्यांच्या पश्चात १ हजार कोटींहून अधिकची संपत्ती सोडून गेले आहेत. सायरस मिस्त्री यांच्या पश्चात इतक्या कोटींची संपत्ती, (Cyrus Mistry wealth worth in crores) जाणून घ्या सविस्तर.
१ हजार कोटीहून अधिकची संपत्ती (Wealth of more than 1 thousand crores) ४ सप्टेंबर १९६८ सोजी सायरस यांचा जन्म झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कुलमधून झाले. १९९० मध्ये इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंग केले. १९९६ मध्ये लंडन विद्यापीठातून लंडन बिझनेस स्कुलमधुन व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. सायरस मिस्त्री यांच्या वडिलांचे नाव पालोनजी मिस्त्री असे आहे. त्यांच्या आईचे नाव पॅटसी पेरीन दुबाश असून त्या आयर्लंडच्या होत्या. त्यांनी भारतासोबत आयर्लंड देशाचेही नागरिकत्व घेतले होते. मिस्त्री यांचा व्यापार(trade of cyrus mistry) भारत, पश्चिम आशिया आणि आफ्रिका खंडात पसरला आहे. टाटा सन्स मध्ये मिस्त्री यांची १८.४ टक्के हिस्सेदारी आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीत मिस्त्री हे टाटा समूहाचे अध्यक्ष झाले होते. पश्चात १ हजार कोटींहून अधिकची संपत्ती सोडून गेले आहेत.
अपघाती मृत्यू (cyrus mistry accidental death) टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कार मुंबईच्या शेजारील पालघर जिल्ह्यात दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. त्यात ते मृत्युमुखी पडले.