पालघर : अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ झालेल्या कार दुर्घटनेत Cyrus Mistry Car accident टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, शापूरजी पालनजी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (५४) यांचा जागीच Cyrus Mistry accidental death मृत्यू झाला. त्यांच्यासह या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघरच्या दापचेरी येथील सीमा तपासणी नाक्यावरचा सायरस मिस्त्री यांच्या कारचे cctv फुटेज Cyrus Mistry Car CCTV Footage हाती लागले आहेत.
डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू - सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं डॉक्टरांनी कारण सांगितलं आहे. डॉक्टर शुभम सिंह यांनी सांगितले की, सायरस मिस्त्रींच्या डोक्यावर मार बसला होता. मृत्यूचं कारणही तेच असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच अपघात होताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. जहांगीर पंडोल यांचाही घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दोघांना जेव्हा रुग्णालयात घेऊन आले, तेव्हा दोघांचाही मृत्यू झाला होता. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय व्यक्ती, उद्योगपती, सहकारी, मित्र यांना धक्का बसला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींनी मिस्त्री यांच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त करत शोकसंवेदना व्यक्त केल्या.
सीटबेल्ट न घातल्याने प्रसंग प्राणावर ओढावला - २०१८ मध्ये सायरस यांची एकूण संपत्ती ७०,९५७ कोटी रुपये होती. ते पत्नी रोहिका छागला यांच्यासोबत मुंबईतील एका आलिशान घरात राहत होते. मुंबईसह आयर्लंड, लंडन आणि दुबईमध्येही त्यांचे निवासस्थान आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे काल मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघातात निधन झाले. पोलिसांच्या प्राथमिक तपास अहवालात त्यांची आलिशान कार दुभाजकाला धडकण्यापूर्वी भरधाव वेगात असल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही तर मागच्या सीटवर बसलेल्या दोन्ही व्यक्तींनी सीट बेल्टही घातला नव्हता. पोलिसांच्या अहवालानुसार, चेकपोस्ट ओलांडल्यानंतर त्यांच्या कारने अवघ्या 9 मिनिटांत 20 किमीचे अंतर कापले असेल.
अनाहिता पांडोळे चालवित होत्या कार - पोलिसांचे म्हणणे आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची कार दुपारी २.२१ च्या सुमारास पोस्टजवळ दिसत होती. चेकपोस्टपासून 20 किमी अंतरावर असलेल्या सूर्या नदीवरील पुलावर दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांच्या अहवालानुसार, ही घटना घडली तेव्हा अनाहिता पांडोळे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची आलिशान कार चालवत होत्या. या अपघातात प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोळे बचावले; मात्र मिस्त्री आणि दारियस यांचा भाऊ जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला. मुंबईपासून सुमारे 120 किमी अंतरावर दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
प्राथमिक तपासातून मोठ्या तथ्यांचा उलघडा -
1) अपघातानंतर सायरस मिस्त्री यांना रुग्णालयात नेण्यात आले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.जहाँगीर दिनशा पांडोळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली.
2) सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि अनाहिता पांडोळेचा भाऊ जहांगीर दिनशा याच्या डाव्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली.
3) सायरस आणि जहांगीर कारच्या मागच्या सीटवर बसले होते. मोटार वाहन कायद्यानुसार सीट बेल्ट बांधणे बंधनकारक आहे. दोघांनीही सीट बेल्ट घातला नव्हता.
4) मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पांडोळे कार चालवत होत्या. सूर्या नदीवरील पुलावरील रस्ता दुभाजकावर कार भरधाव वेगात आदळली. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कार डावीकडून दुसर्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती; परंतु तिचे नियंत्रण सुटले.
5) अनाहिता आणि तिचा नवरा डॅरियस दोघेही कारच्या पुढच्या सीटवर बसले होते. दोघेही गंभीर जखमी झाले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
6) अनाहिता आणि डॅरीस यांना आज मुंबईतील रुग्णालयात रेफर केले जाण्याची शक्यता आहे. अपघातानंतर त्यांना गुजरातमधील वापी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.