ETV Bharat / city

Cyber Sextortion : सेक्सटॉर्शनचा पहिला बळी, घाबरून जाऊन आयुष्य संपवू नका- सायबर तज्ज्ञांचा सल्ला - First victim of sextortion

पुण्यातील धनकवडी येथील एका तरुणाने सेक्सटॉर्शनला कंटाळून आपले जीवन ( young man ended life being fed up with sextortion ) संपवले. पैसे पाठवूनही मेसेज येत राहिल्याने गायकवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र, सेक्सटॉर्शनला कंटाळून ही पहिलीच आत्महत्या असल्याचे सायबर पोलिसांचं म्हणणे आहे. ( Cyber Sextortion )

Cyber Sextortion
सायबर सेक्सटॉर्शन
author img

By

Published : Oct 12, 2022, 9:07 AM IST

मुंबई : पुण्यातील धनकवडी येथील एका तरुणाने सेक्सटॉर्शनला कंटाळून आपले जीवन ( young man ended life being fed up with sextortion ) संपवले. अमोल गायकवाड असे या व्यक्तीचे नाव असून त्याला एका तरुणीने नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. पैसे पाठवूनही मेसेज येत राहिल्याने गायकवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र, सेक्सटॉर्शनला कंटाळून ही पहिलीच आत्महत्या असल्याचे सायबर पोलिसांचं म्हणणे आहे. अशा प्रकारे सेक्सटॉर्शनला कंटाळून आपलं आयुष्य संपवू नये यासाठी सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया यांच्याशी ईटीव्ही भारतने खास बातचीत केली.

सायबर सेक्सटॉर्शन (Sextortion) म्हणजे काय ? हा सोशल मीडियामार्फत होणारा लैंगिक शोषणाचा प्रकार आहे. हा गुन्हा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे घडतो. जिथे गुन्हेगार बनावट प्रोफाईल बनवतात त्यानंतर ते अनोळखी लोकांशी ऑनलाईन घट्ट मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकदा ओळख झाली की, ते त्यांच्या पीडितांना नग्न फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. व्हिडीओ कॉल करत नग्न व्हायला सांगतात आणि तो फोन रेकॉर्ड करतात. एकदा त्यांच्याकडे असे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर त्यांना हे व्हिडीओ पाठवून छळ करतात. पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देतात. सुरुवातीला तरुणांना या जाळ्यात कसं अडकवता येईल याचा विचार केला जातो.

सायबर सेक्सटॉर्शन

अशी घ्या काळजी अनेक तरुण वाहत जात अशा प्रकारच्या जाळ्यात अडकतात. या सगळ्यासाठी वयाची मर्यादा नाही. सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकाला अशा प्रकारची वर्तवणूक करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. तरुण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, चॅटिंग अॅप्स आणि डेटिंग अॅप्समध्ये तरुण मोठ्या प्रमाणावर गुंतले असतात. त्यामुळे त्यांनाच या सगळ्यासाठी टार्गेट केलं जातं. पैसे उकळण्याचे सर्वाधिक वापरले जाणारे शस्त्र म्हणजे सेक्सटॉर्शन. फेसबुक, व्हाट्सअपवर अज्ञात व्यक्तीशी ओळख करून नंतर व्हिडिओ कॉल आला तर जरा विचार करा कॉल लगेच स्वीकारू नका. जर व्यक्ती ओळखीची असेल तर त्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारून ओळखीच्या व्यक्तीचाच कॉल स्वीकारा. कारण व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना विवस्त्र असल्याचे भासवून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जाण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. त्यामुळे असा प्रकार तुमच्यासोबत घडले असेल तर टोकाचे पाऊल न उचलता पोलिसांना याबाबत कळवा असे सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया यांनी सांगितले आहे.

तरूणासोबत असे घडले होते : 30 सप्टेंबर ला सकाळी अमोल हा जिम मधून घरी आला. दरोरोज प्रमाणे 1 वाजेपर्यंत पबजी खेळत होता. दुपारी 1 वाजल्याच्या सुमारास त्याला मॅसेज आलं आणि कॉल आलं आणि तेथून ते चार वाजेपर्यंत चॅटिंग सुरू होती. दोन अज्ञात मोबाईल धारकांकडून अमोल गायकवाड यांच्या व्हाट्सअपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली होती. मेसेज आलेल्या क्रमांकावर एका महिलेचा डीपी होता. त्यानंतर या महिलेने अमोल सोबत चॅटिंग सुरू केले. त्यानंतर संबंधित तरुणास न्यूड कॉल केले. त्यानंतर अमोल याला ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने त्याच्याकडे 12 हजार रुपयांची मागणी केली. या दरम्यान अमोल ने 4500 रुपये तिला दिले देखील. पण अजून पैसे पाहिजे म्हणून अमोल याला मॅसेज येऊ लागले. अखेर अमोलने तिला संदेश पाठविला की, मैं सुसाईड करा रहा हूँ. त्यावर तिने करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हीडीओ व्हायरल कर रही हूँ, अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. तरुणीच्या धमक्यांमुळे अमोल ने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात 4 वाजल्याच्य सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

अशी झाली तरुणासोबत चॅटिंग : दोन अज्ञात मोबाईल धारकांकडून अमोल गायकवाड यांच्या व्हाट्सअपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली. मेसेज आलेल्या क्रमांकावर एका महिलेचा डीपी होता. त्यानंतर या महिलेने तरुणासोबत चॅटिंग सुरू केले. त्यानंतर संबंधित तरुणास न्यूड कॉल केले. त्यानंतर तरुणास ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी करून वेळोवेळी पैसे घेऊन मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्या तरुणाला याचा त्रास होऊ लागला.

अशा वेळेस मित्रांना, पोलिसांना माहिती द्यावी : मित्रांमध्ये आणि मित्रांना जीव देणारा अमोल हा आमचा मित्र होता. पण जेव्हा हे झालं तेव्हा त्याने आम्हाला ही सांगितल नाही की मी अस काही करतोय किंवा मला संबंधित अशी व्यक्ती त्रास देत आहे. आमचं सर्वांना आवाहन आहे की आम्ही जीवाला जीव देणारा मित्र या सोशल मीडिया वरील फेक अकाउंट मुळे गमावला आहे. सर्वांनी अशा बाबतीत सावधानता बाळगणे गरजेचं आहे अशा वेळेस मित्रांना माहिती द्यावी. अस देखील यावेळी अमोल च्या मित्रांनी सांगितल आहे. असा प्रकार तुमच्यासोबत घडले असेल तर टोकाचे पाऊल न उचलता पोलिसांना याबाबत कळवा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.