ETV Bharat / city

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मोठ्या गुन्ह्यांमध्ये घट; मात्र सायबर गुन्हेगारांचे फावले - mumbai police

२३ मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे समोर आले आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात मुंबईतील मोठ्या गुन्ह्यांमध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

mumbai crime
२३ मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे समोर आले आहे.
author img

By

Published : Jun 15, 2020, 12:55 PM IST

मुंबई - २३ मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे समोर आले आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात मुंबईतील मोठ्या गुन्ह्यांमध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

एप्रिलमध्ये शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, चोरी, वाहन चोरी, बलात्कार, विनयभंग आणि दंगली अशा प्रकारचे एकूण 5 हजार 703 गुन्हे घडले होते. मात्र हेच प्रमाण मे महिन्यात घटले असून त्याची संख्या तब्बल 2 हजार 532 वर आली आहे.

२३ मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे समोर आले आहे.
मे महिन्याच्या दरम्यान मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत 10 खुनांचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर, खुनाचा प्रयत्न करणारे 19 गुन्हे घडले आहेत. गेल्या महिन्यात एक दरोड्याचा गुन्हा दाखल असून चेन स्नॅचिंगच्या 12 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. खंडणी मागितल्याच्या प्रकरणी 4 गुन्हे, घरफोडीचे तब्बल 49 गुन्हे, 51 चोरीचे गुन्हे, वाहन चोरीचे 158 गुन्हे, बॉडी ओफेन्स (जखमी करणे) 252, दंगली 24, बलात्कार 19 आणि विनयभंग 56 तर इतर प्रकरणात 1 हजार 877 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मे महिन्यात घडलेल्या 2 हजार 532 गुन्ह्यांपैकी 1 हजार 828 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण करून आरोपींना अटक केली आहे.मागील 5 महिन्यांत मुंबईमध्ये सायबर गुन्ह्यांची वाढमुंबई शहरात 1 जानेवारी 2020 ते 31 मे या काळात विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. संगणक कार्यप्रणालीवर सायबर हल्ला करण्याच्या संदर्भात 4 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर ऑनलाइन फिशिंग, नायजेरियन फ्रॉड संदर्भात 15 गुन्हे दाखल आहेत. अश्लील मेल, एसएमएस व एमएमएस प्रकरणी 72 गुन्हे नोंदवण्यात आले असून सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाइल बनवून गुन्हे करणाऱ्या 16 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या संदर्भात सर्वाधिक 212 गुन्हे नोंदवण्यात आले असून इतर प्रकरणात 614 गुन्हे असे एकूण 938 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.