ETV Bharat / city

सध्या धार्मिकतेच्या नावाखाली देश दुभंगला जातोय; लेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत एक आहे. पण सध्या धार्मिकतेच्या नावाखाली देश दुभगला जात आहे. राम फक्त हिंदुचा नाही तर तो सर्वांचा ‍आहे. देशाची एकजुटता धोक्यात आहे. महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ अशा अनेक समस्या आहेत. या संकटातून मार्ग काढावा लागेल. देशात काहीजणांना रावणासारखा मी पणा आल्याची टीका त्यांनी अप्रत्यक्ष केंद्र सरकारवर केली.

लेखक जावेद अख्तर
लेखक जावेद अख्तर
author img

By

Published : Oct 13, 2022, 9:22 PM IST

मुंबई - काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत एक आहे. पण सध्या धार्मिकतेच्या नावाखाली देश दुभगला जात आहे. राम फक्त हिंदुचा नाही तर तो सर्वांचा ‍आहे. देशाची एकजुटता धोक्यात आहे. महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ अशा अनेक समस्या आहेत. या संकटातून मार्ग काढावा लागेल. देशात काहीजणांना रावणासारखा मी पणा आल्याची टीका त्यांनी अप्रत्यक्ष केंद्र सरकारवर केली.

छगन भुजबळ यांच्या पंच्याहत्ती कार्यक्रमात बोलताना लेखक जावेद अख्तर

गौरव समिती - मी मुस्लिम आहे पण भारतीय मुस्लिम आहे. 'जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा' या गीतातून भाईचाऱ्याचा संदेश देत लोकांचे ऐक्यच देशाला वाचवेल असा संदेश दिला. तसेच, विचारांची लढाई लढणाऱ्या नेत्यांमध्ये भुजबळांचे स्थान आदराचे आहे अशी त्यांनी छगन भुजबळांना शुभेच्छा दिल्या. छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने मुंबईतील ‘षण्मुखानंद’ सभागृहात त्यांनी भाषणादरम्यान हे वक्तव्य केले आहे.

देशाला हजारो वर्षापासून लाभलेली सुसंस्कृत परंपरा कायम - यावेळी लेखक जावेद अख्तर म्हणाले की, आम्ही सांगतो तेच खरे असे जिथे सांगितले जाते तिथे लोकशाही नांदत नाही. आपल्या देशात मात्र लोकशाही अद्याप जिवंत आहे. त्यामागे देशाची विचारधारा आहे. मात्र, आज देशात विभिन्नतेत एकता असतांना ती तोडण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जात आहे. याचा आपल्याला विचार करायला हवा. देशात चुकीच्या गोष्टींबाबत आपण आवाज उठवायला हवा. कारण आपल्या देशाला हजारो वर्षापासून सुसंस्कृत अशी परंपरा लाभलेली आहे. ती कायम राहिला हवी यासाठी सर्वांनी एकत्रित राहायला हवे असे सांगत छगन भुजबळ यांच्या विविध आठवणीना उजाळा त्यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.