मुंबई - ड्रग्स पार्टी प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने आर्यन खान, अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत रवानगी केली आहे. तत्पूर्वी त्या सर्वांना काला किल्ला कोर्टात दाखल करण्यात आले होते. इथे झालेल्या सुनावणीनंतर NCB ला आता या तिघांची कोठडी मिळाली आहे.
एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे किल्ला न्यायालयात दाखल झाले आहेत. मुंबई ते गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर एनसीबीने केलेल्या छापेमारीत आठ जणांना अटक केली होती. यापैकी ३ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश आहे. न्यायालय याप्रकरणी आज पुन्हा सुनावणी घेणार आहे. एनसीबीकडून त्याच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. तर आज आर्यन खान संदर्भात काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
-
Cruise ship raid case | Narcotics Control Bureau seeks 9-day custody of the other five accused in the case
— ANI (@ANI) October 4, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha sent to NCB custody till 7th October.
">Cruise ship raid case | Narcotics Control Bureau seeks 9-day custody of the other five accused in the case
— ANI (@ANI) October 4, 2021
Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha sent to NCB custody till 7th October.Cruise ship raid case | Narcotics Control Bureau seeks 9-day custody of the other five accused in the case
— ANI (@ANI) October 4, 2021
Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha sent to NCB custody till 7th October.
न्यायालयातील कामकाजाचे अपडेट -
- ड्रग्स प्रकरणातील आरोपींविरोधात एनसीबी न्यायालयात सुनावणी सुरू
- एनसीबीने कोर्टात सांगितले, की आधीच अटक केलेल्या 8 आरोपीं व्यतिरिक्त एका व्यक्तीला रिमांडसाठी हजर केले जाईल आणि आज आणखी एकाला अटक केली जाईल.
- आतापर्यंत आर्यनखानसह 9 आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल.
- अटक केलेल्या 5 जणांवर एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 अ चा आरोप
- अटक केलेल्या पाच आरोपींची प्रथम रिमांड सुरू
- इश्मीत सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत छोकर आरोपींची नावे
- NCB: ड्रग्ज विकणाऱ्यांसोबत व्हॉट्सअॅप चॅटचे संभाषण सापडले आहे. त्याप्रमाणे दुवे जोडून आता छापे टाकले जात आहेत.
- व्हॉट्सअॅपमध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी संबंधात धक्कादायक गुन्हेगारी स्वरूपाचे नेटवर्क समोर आल्याची प्राथमिक माहिती
- NCB ने 11 ऑक्टोबरपर्यंत आरोपींची कोठडी मागितली
- NCB च्या वकिलांनी रिया चक्रवर्ती संदर्भात जामीन नाकारलाची ऑर्डर वाचून दाखवली
- NCB च्या वकिलांनी विविध प्रकरणाचा दाखल देत या प्रकरणात बेल कशी नाही देता येणार, याची कारणे सांगितली.
- बॉम्बे हायकोर्टाने दिलेल्या रिया चक्रवर्ती संदर्भात जामीनाचा निर्णयचा दाखला दिला गेला
- आर्यन खान च्या वतीने सतीश माने शिंदे यांनी युक्तीवाद केला.
- माझे अशिल विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले होते म्हणून ते तिथे पोहोचल्याचे आर्यनच्या वकीलांनी सांगितले.
- NDPS सेक्शन 37 प्रमाणे लावलेली कलमे जामीनासाठी अडथळे ठरू शकतं नसल्याचे आर्यनच्या वकीलांचे म्हणणे
- आर्यन याला या पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. आर्यन कुणाच्याही संपर्कात नव्हता.आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद
- आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही. अरबाज हा त्याचा मित्र आहे. दोघं एकमेकांना ओळखतात
- काल NCB ने दोन दिवसांची कस्टडी मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना १ दिवसांची कस्टडी दिली
- आर्यनच्या मोबाइलमध्ये काही मेसेज जे परदेशातील व्यक्तीचे असल्याचे सांगितले जात आहेत. मात्र आर्यनकडून ड्रग्ज खरेदी आणी विक्रीबाबत कोणतेही पुरावे एनसीबीला मिळालेले नाहीत
- तसेच कुठल्याही ड्रग्ज तस्कराशी आर्यनचे काहीही संबध नाहीत
- अनिल सिंग, रिया चक्रावर्तीची ऑर्डर वाचून दाखवत आहेत ज्यात तिला जामीन नाकारण्यात आला होता
- या आरोपींवर जामीन मिळणारे असे सेक्शन जरी लावलेले असले तरी मी मुंबई हायकोर्टात सुनावणी झालेली तीन उदाहरणे समोर ठेवतो ज्यामध्ये NDPS ऍक्टमधील प्रकरणात जामीन नाकारण्यात आला होता - ASG अनिल सिंग
- नुसत्या सापडलेल्या व्हॉट्स अँप चॅटवरून कुणालाही ड्रग्ज बाळगणे किंवा त्याची तस्करी करत असल्याचे ठरवले जाऊ शकत नाही.
- ज्या मोबाइल मधील चॅटच्या आधारे कस्टडी मागितली जात आहे. ती चुकीची आहे.
- आर्यनने ड्रग्ज खरेदी केलेलं नाही. तर त्याचं व्यसनही केलेलं नाही. -वकील
हे ही वाचा -एनसीबी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; कॉर्डीलिया द क्रूझवर पुन्हा छापेमारी
ड्रग्सप्रकरणी अटकेत असलेल्या मुलगा आर्यन खान याच्यासहित दोघांना पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले आहे. नंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. एनसीबीची टीम या सर्वांना घेऊन जेजे रुग्णालयाकडे रवाना झाली.
काय आहे प्रकरण ?
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. दरम्यान, एनसीबीने पार्टीच्या आयोजकांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवासी बनून शिपमध्ये प्रवास केला आणि ही कारवाई केली.