मुंबई - शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही कंपनीने नुकसानभरपाई देताना जाचक अटी लादल्यामुळे नुकसान होऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. कृषी विभागाने सरकारला दिलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना मदत मिळाली हेच पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी, याकरता भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात आवाज उठवला. यावर कृषिमंत्र्यांनी त्यांना समाधानकारक उत्तर दिले नसल्यामुळे भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला आहे.
पीक विम्याचे पैसे दिले नाही तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही - भाजप आमदार - minister will be allowed to roam in the district
शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही कंपनीने नुकसानभरपाई देताना जाचक अटी लादल्यामुळे नुकसान होऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. कृषी विभागाने सरकारला दिलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना मदत मिळाली हेच पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदारांनी सभागृहात केली.

पीक विम्यावरून भाजप आक्रमक
मुंबई - शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही कंपनीने नुकसानभरपाई देताना जाचक अटी लादल्यामुळे नुकसान होऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. कृषी विभागाने सरकारला दिलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना मदत मिळाली हेच पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी, याकरता भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात आवाज उठवला. यावर कृषिमंत्र्यांनी त्यांना समाधानकारक उत्तर दिले नसल्यामुळे भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला आहे.
पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार
राणा जगजीतसिंग यांची आक्रमक भूमिका -
भाजपचे आमदार राणा जगजीत सिंग यांनी पीक विमा संदर्भात आक्रमक भूमिका मांडत शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरसकट पीक विमा मिळवून देण्यात यावा, यासाठी मी आज सभागृहात आवाज उठवला. भाजपच्या सर्व आमदारांनी त्याला पाठिंबा देत कृषीमंत्र्यांना पिक विमा संदर्भात जाब विचारला असता कृषिमंत्र्यांनी त्यावर समाधानकारक उत्तर दिलेलं नाही या सरकारला शेतकऱ्यांचे भले करायचं नाही. त्यामुळे सरकार पीक विम्याच्या पैशासंदर्भात टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आम्हाला सभागृहात बोलू देखील दिले जात नसल्यामुळे आम्ही आज सभात्याग केलेला आहे.भाजपचे संभाजी निलंगेकर-पाटीलही आक्रमक -
यावर भाजपचे आणखी एक आमदार संभाजी निलंगेकर पाटील यांनी सरकारवर पिक विमा संदर्भात टीका केली आहे. त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितले की हे सरकार सरसकट पिक विमा शेतकऱ्यांना देण्यासाठी उदासीन आहे. जेव्हा शिवसेना पीक विमा संदर्भात आक्रमक होती तशी आक्रमकता आता शिवसेनेमध्ये दिसत नाही. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांना आणि गोरगरीब जनतेला न्याय द्यायचा नाही. कृषिमंत्री शेतकऱ्यांचे आहेत की, पिक विमा कंपनीचे आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत तर आम्ही एकाही मंत्र्याल जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला.

Last Updated : Mar 5, 2021, 3:46 PM IST