मुंबई - बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रावर कोणीही महाराष्ट्रात येऊन काही म्हणणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. प्रश्न करण्याचा अधिकार कोण त्या कांचन गिरी आहेत त्यांना नाही. इथे जेव्हा युपी आणि बिहारच्या लोकांना मारले जात होते, तेव्हा या कांचन माँ कुठे होत्या? असा प्रश्न उपस्थित करत नवं हिंदुत्व जन्माला येते आहे आणि हे नवं हिंदुत्व ब्रिटीशांपेक्षाही भारी पडेल, अशी भीती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. धार्मिक काम करणाऱ्या लोकांनी राजकारण करू नये, असे आवाहनही महापौरांनी केले आहे. कांचन गिरी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज (सोमवारी) राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्या येथे येण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांनीही अयोध्याला येणार असल्याचे त्यांना आश्वासन दिले आहे. यावर महापौर बोलत होत्या.
'नवं हिंदुत्व जन्माला येते आहे का ?'
त्या गुरु माँ चे नाव काय ? कांचन गिरी ? बाळासाहेबांच्या पुत्राने ज्या वेळी राम जन्मभूमी येथे जाऊन ज्या पद्धतीने काम केले तेव्हा या कुठे होत्या ? यांना कोणालाही प्रमाणपत्र देण्याचा अधिकार काय? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेबांच्या पुत्रावर कोणीही महाराष्ट्रात येऊन काही बोलणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला आहे. देशात नवं हिंदुत्व जन्माला येते आहे आणि हे नवं हिंदुत्व ब्रिटीशांपेक्षाही भारी पडेल, अशी भीती महापौरांनी उपस्थित केली आहे. शिवसेनेचे हिंदुत्व पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल आहे. हिंदुत्व आणि धर्माच प्रत्येकाला अभिमान आहे. घरात धर्म पाळा आणि घराबाहेर आल्यानंतर राष्ट्रीयत्व पालण म्हणजेच हिंदुत्व आहे. हिंदुत्व हे मिरवण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. त्याला सोयीनुसार वापरू नका, असे आवाहन महापौरांनी केले. नवं हिंदुत्व जन्माला येते आहे का? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला.
'टास्क फोर्स देईल त्या नियमाची अंमलबजावणी'
मुंबईमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कमी झाली आहे. पण पुढे लाट येणार नाही असे होणार नाही. कोरोनाचे नियम सर्वाना पाळावे लागतील. येत्या काळात दिवाळी आणि इतर सण येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक होणार आहे. राज्यांतील आणि देशातील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. चालू परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार. टास्क फोर्स याबाबत जो निर्णय घेईल त्या आदेशांच पालन केले जाणार असल्याचे महापौर म्हणाल्या.
'लसीकरणासाठी वंचीत ठेवायचे नाही'
मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी फिरते लसीकरण केंद्र असतील. कोणालाही लसीकरण करण्यासाठी वंचीत ठेवायचे नाही, म्हणून फिरत लसीकरण केंद्र सुरू करत आहोत. लहान मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. ते पाहून राणी बाग लहान मुलांसाठी सुरू करायचा निर्णय घेतला जाईल. लोकल प्रवासाच मला ठाऊक नाही, राज्य सरकार यावर निर्णय घेईल. वरळी हिजाब प्रवेशावरून टीका होत आहे. याबाबात बोलताना असे होताच काम नये, असा अजेंडा कोणता मॉल चालवतय का ? अस असेल तर ते चुकीचे आहे. त्या महिलेवर कसला संशय असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जर मुद्दाम केले असेल तर ते चुकीचे आहे. याची माहिती घेऊन जर कोणी चुकत असेल तर त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरु माँ कांचन गिरी यांनी घेतली भेट