ETV Bharat / city

महाराष्ट्रावर वीज टंचाईचे संकट, काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका - केंद्राकडून कोळसा पुरवठा बंद

राज्यात आलेल्या कोळशाच्या टंचाईमुळे 3,330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाल्याने राज्यावर विजेचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक वीज निर्मिती संच यावर एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याने वीज तुटवड्याचा गंभीर प्रश्न राज्यात समोर उभा राहिला आहे.

Nana Patole
Nana Patole
author img

By

Published : Oct 11, 2021, 8:46 PM IST

Updated : Oct 12, 2021, 3:43 PM IST

मुंबई - राज्यात आलेल्या कोळशाच्या टंचाईमुळे 3,330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाल्याने राज्यावर विजेचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक वीज निर्मिती संच यावर एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याने वीज तुटवड्याचा गंभीर प्रश्न राज्यात समोर उभा राहिला आहे. दरम्यान, ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही. त्या राज्यांना जाणून-बुजून कोळसा पुरवला जात नाही. महाराष्ट्रातील सामान्य जनतेला त्रास देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही भूमिका स्वीकारली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

3,330 मेगावॅटचा वीज पुरवठा ठप्प -

राज्यात आलेल्या कोळशाच्या टंचाईमुळे 3,330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाल्याने राज्यावर विजेचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक वीज निर्मिती संच यावर एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याने वीज तुटवड्याचा गंभीर प्रश्न राज्यात समोर उभा राहिला आहे. तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडून वीज खरेदी तसेच जलविद्युत या दोन पर्यायाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मागणी आणि वीजनिर्मिती यात मोठी तफावत असल्याने येणाऱ्या दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात वीज तुटवड्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असं मत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. पारस येथील 250 मेगावॅट, चंद्रपूर आणि भुसावळ येथील 500 मेगावॅट, तर पोस्टल गुजरात पावर अनलिमिटेडचे चार संच बंद आहेत. या चार संचामध्ये 240 मेगावॅट वीज निर्मिती केली जात होती. तर अमरावतीतील 810 मेगावॅट वीज निर्मिती करणारे तीन संच बंद झाले आहे.

एक ते दीड दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध -

महावितरणकडून आलेल्या माहितीनुसार जवळपास तेरा संचामध्ये कोळशाचा तुटवडा आहे. यामध्ये सर्वात जास्त तुटवडा हा चंद्रपूर कोराडी खापेरखेडा परळी, पारस आणि नाशिक येथील वीज संचामध्ये आहे. कोपर्डी येथे 2400 मेगावॅट, चंद्रपूरमध्ये 2920 मेगावॅट, खापरखेडामध्ये 1340 मेगावॅट, परळीमध्ये 750 मेगावॅट, पारसमध्ये 500 मेगावॅट, नाशिकमध्ये 630 मेगावॅट, तर भुसावळमध्ये बाराशे दहा मेगावॅट एवढी वीज निर्मिती होते. मात्र सध्याची या सर्व वीज निर्मिती संच याची कोळशाची परिस्थिती पाहिली तर जवळपास एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळशाचासाठा वीज निर्मिती संचाकडे आहे. त्यामुळेच राज्यावर वीजनिर्मितीचा संकट येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेसकडून टीका

राज्यातील 19 वीज निर्मिती करणारे संच बंद पडले आहेत. ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही. त्या राज्यांना जाणून-बुजून कोळसा पुरवला जात नाही. नैसर्गिक आपत्ती किंवा पाऊस असल्याचे सांगून कोळसा देण्याचे टाळलं जात आहे. मात्र केंद्राचे ऊर्जामंत्री वीज टंचाई नसल्याचे सांगतात. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अनेकदा केंद्रीय ऊर्जा मंत्री यांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिल्लीत भेटून देखील राज्याला मदत केली जात नाही. महाराष्ट्रातील सामान्य जनतेला त्रास देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही भूमिका स्वीकारली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

हे ही वाचा - Maharashtra Bandh : शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार, नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार

मागील सरकारच्या चुकीचा फटका -
भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयाचा फटका महावितरणला बसला असल्याचे मत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये महावितरण वरील थकबाकीची रक्कम वाढल्यानेच राज्यासमोर विजेचे संकट तयार झाला आहे. भाजप सरकारच्या काळामध्ये रस्त्यावरील दिव्यांची विजेची थकबाकी सहा हजार 299 कोटी होती. तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची थकबाकी 2,514 कोटी एवढी होती. अशा प्रकारे ही थकबाकी वाढत 8,813 कोटी एवढ्यावर गेल्यानेच राज्यासमोर हे संकट आले असल्याचा आरोप ऊर्जामंत्री यांनी केला आहे.

Last Updated : Oct 12, 2021, 3:43 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.