मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या कार्यालयाची तपासणी केली. या तपासणीमध्ये पोलिसांना कुंद्राच्या कार्यालयात छुपे कपाट आढळून आले आहे.
मुंबई पोलीस गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या अंधेरीमधील जे. एल. स्ट्रीम कार्यालयाची तपासणी केली. ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा-'ते साहित्य पोर्नोग्राफिक नाही' राज कुंद्रा यांचे हायकोर्टात अटकेला आव्हान
पोर्नोग्राफी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले व्यावसायिक राज कुंद्रा यांनी अटकेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून कुंद्रा यांनी अटकेच्या कारवाईलाच आव्हान दिले आहे. त्यांच्यावरील आरोपांशी संबंधित व्हिडिओ हे "कामुक" म्हणून गणले जाऊ शकतात मात्र त्यातून कोणतेही "स्पष्ट लैंगिक कृत्य" दाखविले जात नाही असा युक्तिवाद कुंद्रा यांनी याचिकेत केला आहे.
हेही वाचा-सई ताम्हणकरचा राज कुंद्राच्या चित्रपटात घेण्यासाठी विचार सुरु होता -अभिनेत्री गहना वशिष्ठ
कुंद्रा यांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा (45) यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली होती. मंगळवारी कुंद्रा यांना न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांना 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आत याची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवली आहे.
हेही वाचा-"'हंगामा 2' बघू का तुझ्या नवऱ्याच्या बातम्या बघू'', शिल्पा शेट्टीला नेटकऱ्यांचा सवाल
काय आहे प्रकरण?
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार की राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. त्याच्याविरोधात पोलिसांकडून पुरेसे पुरावे आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मुंबईत अश्लील सिनेमा व चित्रफित बनवले जात असून ते मोबाईल ॲपद्वारे प्रदर्शित केली जात होते. यापूर्वीही राज कुंद्राची पोलिसांनी विविध प्रकरणात चौकशी केली होती.