ETV Bharat / city

Mumbai Booster Dose : मुंबईत शुक्रवारपासून कोविड लस अमृत महोत्सव, ३० सप्टेंबरपर्यंत विनामूल्य बुस्टर डोस - मुंबईत शुक्रवारपासून ३० सप्टेंबरपर्यंत विनामूल्य बुस्टर डोस

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रीत्यर्थ आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात १५ जुलै पासून ७५ दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबविण्यात येणार आहे. त्यानुसार लसीचे दोन डोस घेवून ६ महिने झालेल्या १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार ( mumbai booster dose free 30 september ) आहे.

Mumbai Booster Dose
Mumbai Booster Dose
author img

By

Published : Jul 14, 2022, 9:30 PM IST

मुंबई - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रीत्यर्थ आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात १५ जुलै पासून ७५ दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने उद्यापर्यंत ( 15 जुलै ) कोविन प्रणाली त बदल होणार आहेत. त्यानुसार लसीचे दोन डोस घेवून ६ महिने झालेल्या १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. या कोविड लस अमृत महोत्सवमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले ( mumbai booster dose free 30 september ) आहे.

मुंबईतील लसीकरण - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु आहे. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी मुंबईत महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात १०४ तर खासगी रुग्णालयात १२५ अशी एकूण २२९ कोविड-१९ लसीकरण केंद्र सध्या कार्यान्वित आहेत. १८ वर्षांवरील लाभार्थी लक्षात घेता, मुंबईत आतापर्यंत १ कोटी ०३ लाख १५ हजार ००४ लाभार्थ्यांना (११२ टक्के) पहिली मात्रा देण्यात आली आहे. तर ९३ लाख ५६ हजार ५४१ लाभार्थ्यांना (१०१ टक्के) दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

१२ टक्के नागरिकांना बूस्टर डोस - कोविड-१९ लसीचा बूस्टर डोस १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहे. यामध्ये फक्‍त आरोग्‍य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी त्याचप्रमाणे ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांनाच महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांवर मोफत प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत होती. तर १८ वर्षे वयावरील इतर सर्व पात्र नागरिकांना १० एप्रिल २०२२ पासून खासगी रुग्णालयांमध्‍ये सशुल्‍क प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यास परवानगी देण्यात आली. असे असले तरी, आतापर्यंत फक्‍त ९ लाख ९२ हजार १७७ (१२ टक्के) एवढ्या लाभार्थ्यांनी प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घेतली आहे. म्हणजेच प्रतिबंधात्मक मात्रा लसीकरणाचे प्रमाण कमी असल्‍यामुळे त्याची गती वाढविणे आवश्‍यक आहे.

कोविन प्रणालीत उद्यापर्यंत बदल - केंद्र सरकारने देशाच्‍या स्‍वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, दिनांक १५ जुलै ते ३० सप्‍टेंबर २०२२ या कालावधीपर्यंत ‘कोविड लस अमृत महोत्‍सव’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या ७५ दिवसांच्या कालावधीत वय वर्षे १८ वरील सर्व पात्र लाभार्थ्‍यांना कोविड-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर विनामूल्य देण्‍यात येणार आहे. ज्‍या लाभार्थ्‍याने कोविड-१९ लसीची दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर ६ महिने म्हणजेच २६ आठवडे पूर्ण झालेले असतील, तेच लाभार्थी या बूस्टर डोसकरीता पात्र असतील. कोविड लस अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने पात्र नागरिकांना लसीकरणाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने, केंद्र सरकारतर्फे यासंदर्भात कोविन प्रणालीमध्‍ये आवश्‍यक ते बदल उद्या दिनांक १५ जुलै २०२२ रोजी सकाळपर्यंत करण्‍यात येणार आहेत. कोविड लस अमृत महोत्सवाचा लाभ घेवून संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

हेही वाचा - Booster Dose: करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा केंद्राचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.