मुंबई - राज्यात सोमवारी ४ हजार ५०५, मंगळवारी ५ हजार ६०९, बुधवारी ५ हजार ५६०, गुरुवारी ६ हजार ३८८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. काल शुक्रवारी त्यात किंचित वाढ होऊन ६,६८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज शनिवारी रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होऊन ५,७८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी ६८, मंगळवारी १३७, बुधवारी १६३, गुरुवारी २०८ मृत्यूची नोंद झाली होती. काल त्यात घट होऊन १५८ मृत्यूंची नोंद झाली. आज मृत्यू संख्येत आणखी घट होऊन १३४ मृत्यूची नोंद झाली आहे.
५,३५२ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात गुरुवारी ५,३५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,८६,२३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ५,७८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १३४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३४,९०९ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०७,५९,७६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,८७,८६३ (१२.५८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,७३,८१२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६३,२६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मृत्यूदर २.११ टक्के -
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.११ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
..या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - २६५
रायगड - ११३
अहमदनगर - ७८५
पुणे - ५८४
पुणे पालिका - २८५
पिपरी चिंचवड पालिका - १९६
सोलापूर - ६६१
सातारा - ७४४
कोल्हापूर - २९१
सांगली - ५२७
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ११९
सिंधुदुर्ग - ७७
रत्नागिरी - १५१
बीड - १४१
उस्मानाबाद - ७७
बीड - १२७