ETV Bharat / city

Court Excuses Salman Khan : पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात सलमान खानला न्यायालयात हजर राहण्यापासून सूट

author img

By

Published : Apr 5, 2022, 3:38 PM IST

Updated : Apr 5, 2022, 3:54 PM IST

पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला आज हजर राहण्यापासून न्यायालयाकडून सूट ( Court Excuses Salman Khan ) देण्यात आली आहे. त्याला पुढील तारीख ९ मे देण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान ( Actor Salman Khan ) आज अंधेरी कोर्टात हजर होणार होता.

Court Excuses Salman Khan
सलमान खान

मुंबई - पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला आज हजर राहण्यापासून न्यायालयाकडून सूट ( Court Excuses Salman Khan ) देण्यात आली आहे. त्याला पुढील तारीख ९ मे देण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान ( Actor Salman Khan ) आज अंधेरी कोर्टात हजर होणार होता. न्यायालयाने 22 मार्च रोजी समन्स बजावले होते. हे प्रकरण 2019 सालातील आहे, जेव्हा सायकल चालवताना पत्रकाराशी वाद झाला होता. यावर त्या पत्रकाराने सलमान खानवर गुन्हा दाखल केला होता. सलमान खानने हा खटल्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर आज सुनावणी होणार झाली.

प्रतिक्रिया

आजपुरती त्यांना न्यायालयाने दिली सूट - अभिनेता सलमान खान याला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे, एका पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप आहे. या प्रकरणात केवळ सलमान नव्हे तर त्याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख याचेही नाव घेतले गेल्यामुळे तोही कायदेशीर अडचणीत आहे. दरम्यान आज या दोघांनाही न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र आजपुरती त्यांना न्यायालयाने सूट दिली आहे.

Court Excuses Salman Khan
अंधेरी न्यायालय

काय आहे प्रकरण? एके दिवशी मुंबईत रस्त्यावर सायकल चालवत असताना काही पत्रकारांनी सलमानचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान सलमानच्या बॉडीगार्डने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर सलमानच्या बॉडीगार्डने वाद घालत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. पांडे यांच्या तक्रारीवरुन सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरोधात भादंवि कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (धमकावणे), 323 (एखाद्याला इजा करणे), 392 (दरोडा), 506 (गुन्हेगारी प्रवृत्ती), 34 (एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समान हेतू) या कलमांतर्गत डीएननगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर महानगर दंडाधिकारी आरआरखान यांच्यासमोर सुनावणी पार पडली. रेकॉर्डवरील सामग्री, पोलिसांचा सकारात्मक अहवाल आणि इतर पुरावे लक्षात घेऊन, आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करत आरोपींना समन्स जारी केले.

हेही वाचा - Sanjay Raut Property Seize By ED : शिवसेना नेते संजय राऊतांविरोधात ईडीची मोठी कारवाई; ११.१५ कोटींची मालमत्ता जप्त

Last Updated : Apr 5, 2022, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.