ठाणे - भिवंडीतील आरएसएसचे पदाधीकारी राजेश कुंटे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर ( Congress leader Rahul Gandhi ) दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात आज रोजी भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी ( Rahul Gandhi hearing ) होऊन राहुल गांधी यांना गैरहजर राहण्यास न्यायालयाने ( Court allows Rahul Gandhi to be absent ) आज परवानगी दिली आहे. भिवंडीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल.सी. वाडीकर यांनी दिवसभरासाठी गैरहजर राहण्याच्या अर्जाला परवानगी दिली. मात्र, या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आल्याची माहिती राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी दिली.
आज राहुल गांधींच्या वतीने वकील अय्यर यांनी भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी वेळी गांधी यांना गैरहजर राहण्यास परवनगी देण्यात यावी यासाठी अर्ज दाखल केला. या अर्जात नमूद केले कि, खासदार राहुल गांधींची आई तथा काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी रुग्णालयात आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना आज न्यायालयात गैरहजर राहण्यास परवानगी देण्यात यावी म्हणून अर्ज सादर केला. तसेच याचिकाकर्ते राजेश कुंटे यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाल्याने त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे याचिकाकर्ते राजेश कुंटे यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी अर्ज करून गैरहजर राहण्यास परवानगी मागणी केली.
या दोन्ही अर्जावर सुनावणी होऊन दोघांनाही गैरहजर राहण्यास परवानगी न्यायालयाने दिली. मात्र, याचीकाकर्ते कुंटे यांच्या वकिलांनी या प्रकरणात न्यायालयात कायमस्वरूपी गैरहजर राहण्याच्या राहुल गांधींच्या विनंती अर्जावर आक्षेप घेत, "आरोपींच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते" असे न्यायालया समोर मत मांडले. त्यामुळे या अर्जावर पुढील सुनावली ६ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी दिली आहे.