ETV Bharat / city

अंधेरी, भांडूप येथे सर्वाधिक तर मुलुंड, गोवंडी मानखुर्द, चेंबूर, गिरगावात कमी कृत्रिम तलाव

author img

By

Published : Aug 22, 2020, 10:37 PM IST

गणेशोत्सवात विसर्जन ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने विभागवार कृत्रिम तलाव उभारले आहेत. त्यापैकी सर्वाधिक कृत्रिम तलाव अंधेरी पूर्व व भांडुप येथे उभारण्यात आले आहेत.

mumbai
संग्रहित छायाचित्र

मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. विसर्जन ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने विभागवार कृत्रिम तलाव उभारले आहेत. त्यापैकी सर्वाधिक कृत्रिम तलाव अंधेरी पूर्व व भांडुप येथे उभारण्यात आले आहेत. तर सर्वात कमी तलाव मुलुंड, गोवंडी मानखुर्द, चेंबूर, गिरगांव आदी विभागात आहेत.

मुंबईत गणेशोत्सव हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. कोरोनाचा प्रसार होईल म्हणून यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान 2 लाख 30 हजार मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. त्यापैकी सुमारे 34 हजार मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाते. यंदा समुद्र किनारी, चौपाट्या, तलावावर भाविकांनी गर्दी करू नये म्हणून मुंबई महापालिकेने 168 कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत. या कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मूर्त्यांचे विसर्जन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. त्याच सोबत 7 ते 8 ठिकाणी वाहनांवर फिरती मूर्ती संकलन केंद्रे असणार आहेत त्याचाही लाभ भाविकांनी घ्यावा असेही आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यासाठी भाविकांनी विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करू नये म्हणून कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी त्यांच्या विभागातच विसर्जन करता यावे म्हणून कृत्रिम तलाव उभारले असून त्याचा लाभ घ्यावा. कृत्रिम तलावांची यादी आणि पत्ता पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

कोणत्या विभागात किती कृत्रिम तलाव -
गिरगांव येथील सी विभागात 3,
मुंबई सेंट्रल डी वॉर्ड विभागात 6,
भायखळा येथील ई विभागात 6,
लालबाग परळ येथील एफ दक्षिण विभागात 13,
माटुंगा अँटॉप हिल येथील एफ उत्तर विभागात 3, वरळीच्या जी दक्षिण विभागात 8,
धारावी माहीम येथील जी उत्तर विभागात 8,
वांद्रे सांताक्रूझ पूर्व येथील एच पूर्व विभागात 4,
सांताक्रूझ वांद्रे पश्चिम येथील एच पश्चिम विभागात 5,
अंधेरी पूर्व येथील के पूर्व विभागात 16,
अंधेरी जोगेश्वरी येथील के पश्चिम विभागात 12,
गोरेगाव येथील पी दक्षिण विभागात 8,
मालाड येथील पी उत्तर विभागात 13,
कांदिवली येथील आर दक्षिण विभागात 10,
बोरिवली येथील आर मध्य विभागात 11,
दहिसर येथील आर उत्तर विभागात 8,
कुर्ला एल विभागात 6,
गोवंडी मानखुर्द येथील एम पूर्व विभागात 2,
चेंबूर येथील एम पश्चिम विभागात 3,
घाटकोपर येथील एन विभागात 5,
भांडुप विक्रोळी पूर्व येथील एस विभागात 16
मुलुंडच्या टी विभागात 2

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.