ETV Bharat / city

कोरोनाचे थैमान : कस्तुरबा रुग्णालय 'हाऊसफुल', पालिकेच्या इतर रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड, ओपीडी सुरू - जागतिक आरोग्य आणीबाणी

राज्यात कोरोना विषाणूबाधित ५२ तर, मुंबई आणि मुंबई परिसरात कोरोना २१ विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १७ मार्चला एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कस्तुरबा रुग्णालयात गेल्या २४ तासांत ५४० बाह्य रुग्ण तपासण्यात आले. यादरम्यान ११४ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले.

कोरोनाचे थैमान
कोरोनाचे थैमान
author img

By

Published : Mar 20, 2020, 11:40 PM IST

मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई आणि परिसरातील कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मुंबई परिसरातील इतर जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील रुग्णही मोठ्या प्रमाणात पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल होत आहेत. यामुळे कस्तुरबा रुग्णालयातील आयसोलेशन बेडची क्षमता संपल्याने पालिकेच्या इतरही रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्ड आणि ओपीडी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनाचे थैमान : कस्तुरबा रुग्णालय 'हाऊसफुल', पालिकेच्या इतर रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड, ओपीडी सुरू

राज्यात कोरोना विषाणूबाधित ५२ तर, मुंबई आणि मुंबई परिसरात कोरोना २१ विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १७ मार्चला एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कस्तुरबा रुग्णालयात गेल्या २४ तासांत ५४० बाह्य रुग्ण तपासण्यात आले. यादरम्यान ११४ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्यापैकी मुंबईमधील दोन आणि मुंबईबाहेरील एक अशा तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कस्तुरबा रुग्णालयातून ८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात १२२ तर, जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात ५ असे एकूण १२७ रुग्ण भरती आहेत.

पालिकेच्या कस्तुरबा रुग्णलयात आयसोलेशनचे १२७ बेड आहेत. सतत नवीन येणाऱ्या रुग्णांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील बेड अपुरे पडू लागले आहे. कस्तुरबा रुग्णालयात १२७ बेड असताना त्यात आता १२२ रुग्ण आहेत. यामुळे कस्तुरबा रुग्णालयातील क्षमता पूर्ण झाल्यास पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात २०, कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात १०, वांद्र्यातील भाभा रुग्णालयात १० तर जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात २० आयसोलेशन बेड सज्ज ठेवण्यात आले होते. कस्तुरबा रुग्णालयावर वाढणारा ताण पाहता पालिकेने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. पालिकेच्या या रुग्णालयात आयसोलेशन बेडसह ओपीडी सेवाही सुरू केली आहे. यामुळे रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात चाचण्या आणि उपचार करून घेण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही. या रुग्णांलयामध्ये रुग्णांच्या चाचण्या केल्या जाणार असल्या तरी, कस्तुरबा रुग्णालयांमधूनच त्यांचे अहवाल संबंधित रुग्णालयांना पाठवले जाणार आहेत.

या रुग्णालयातही आयसोलेशनचे बेडची सुविधा

मुंबई महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून फोर्टिसमध्ये १५, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात ५०, रेल्वेच्या भायखळा येथील आंबेडकर रुग्णालयात ३०, जसलोक रुग्णालयात ५, एच एन रिलायन्स रुग्णालयात २, माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात २०, कोकिलाबेन रुग्णालयात १७, रहेजा रुग्णालयात १२, जगजीवन राम वेस्टर्न रेल्वे रुग्णालयात १०, गुरुनानक रुग्णालयात २, सेंट एलिझाबेथ रुग्णालयात २, बॉंबे रुग्णालयात ४ तर लीलावती रुग्णालयात १५ आयसोलेशन बेडची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा - कमालच आहे!... आता बसस्थानकातील सॅनिटायझरच्या बाटल्याही गेल्या चोरीला

हेही वाचा - सरकारचा 'हा' निर्णय लागू होण्यापूर्वीच मंत्रालयात शुकशुकाट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.