मुंबई - देशात आज 19893 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद करण्यात आली आहे. तर 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 22742 रुग्णांना घरी सोडण्यात ( Corona patient discharges ) आले. तर 136478 सक्रिय रुग्ण आहेत. आणि सकारात्मकता दर 0.31 टक्के इतका आहे.
-
COVID19 | India reports 19,893 new cases in the last 24 hours; Active caseload at 1,36,478 pic.twitter.com/1GsaohW6bH
— ANI (@ANI) August 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">COVID19 | India reports 19,893 new cases in the last 24 hours; Active caseload at 1,36,478 pic.twitter.com/1GsaohW6bH
— ANI (@ANI) August 4, 2022COVID19 | India reports 19,893 new cases in the last 24 hours; Active caseload at 1,36,478 pic.twitter.com/1GsaohW6bH
— ANI (@ANI) August 4, 2022
दिल्लीमध्ये पुन्हा कोरोनाचा फैलाव - राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेय. मागील 24 तासांत राजधानी दिल्लीमध्ये 2 हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेटमध्येही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 2 हजार 73 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक हजार 437 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 400 वर- मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ ( Increase in the number of corona virus patients ) झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत होती. आज त्यात वाढ होऊन ४३४ रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २१९ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
४३४ नवे रुग्ण - मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ७२५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४३४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. २८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २५ हजार ७४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३ हजार ९८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार १०६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २८३१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२५ टक्के इतका आहे.
हेही वाचा - ईडीच्या 'या' कारवाईवर काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी, संसदेत गदारोळ होण्याची शक्यता