ETV Bharat / city

Coronavirus New Cases : चिंता वाढली! कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, नव्या रुग्णांची संख्या 20 हजारांहून अधिक

Coronavirus New Cases : देशात दोन दिवस कोरोनाबाधितांमध्ये घट झाल्यानंतर आज रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ( Covid19 Updates ) आजची देशातील कोरोनाची परिस्थिती काय जाणून घ्या.

Coronavirus New Cases
Coronavirus New Cases
author img

By

Published : Jul 21, 2022, 9:48 AM IST

मुंबई - देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या 2 दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मागील 2 दिवस देशात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याची नोंद झाली होती. ( Coronavirus New Cases )पण आज पुन्हा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ( Covid19 Updates ) देशात गेल्या 24 तासांत 21 हजार 566 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

दिवसभरात 18 हजार 294 रुग्ण कोरोनामुक्त - देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काल कोरोनाने 40 रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 5 लाख 25 हजार 825 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ( Covid19 Updates ) सध्या देशात 1 लाख 48 हजार 881 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

  • #COVID19 | India reports 21,566 fresh cases and 18,294 recoveries in the last 24 hours.

    Active cases 1,48,881
    Daily positivity rate 4.25%

    — ANI (@ANI) July 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईत बुधवारी २९० नवे कोरोना रुग्ण, १ मृत्यूची नोंद- मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २९० रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २५९ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

२९० नवे रुग्ण - मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ८५३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २९० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. ३८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २१ हजार ८२३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख १९८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २६२१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२७ टक्के इतका आहे.

पुण्यात सर्वाधिक नवे रुग्ण - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2279 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर मंगळवारी दिवसभरात एकूण 2646 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्येन नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे महानगरपालिकेतील आहे. पुणे महानगरापालिकेत सर्वाधिक म्हणजे 441 रुग्णांची भर पडली आहे.

हेही वाचा - Daund MLA Rahul Kul : राहुल कुल यांनी 18 कोटी देण्याचे मान्य केले अन् आरोपी जाळ्यात!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.