ETV Bharat / city

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट... - Maharashtra Health Department

महाराष्ट्रात ओमायाक्रॉनचे रुग्ण वाढताना दिसून ( Coronavirus In Maharashtra ) येत आहेत. रुग्णाचा आलेख वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) निर्बंध जाहीर केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात रुग्णांच्या आकडेवारीवरून नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लसीकरणावरही भर देण्यात येत आहे.

Coronavirus In Maharashtra
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Jan 7, 2022, 10:53 AM IST

Updated : Jan 7, 2022, 4:36 PM IST

मुंबई - राज्यात सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सर्वांची डोकेदुःखी वाढवली आहे. महाराष्ट्रात ओमायाक्रॉनचे रुग्ण वाढताना दिसून ( Coronavirus In Maharashtra ) येत आहेत. रुग्णाचा आलेख वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) निर्बंध जाहीर केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात रुग्णांच्या आकडेवारीवरून नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. नवीन निर्माण झालेल्या व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवरीला महाराष्ट्रात 9 हजार 170 कोरोना रुग्ण आढळले होते. यानंतर आजच्या दिवसांपर्यंत रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत नसून आलेख वाढतच चालला आहे. यानंतर 2 जानेवरी रोजी 11 हजार 887 एवढे कोरोनाचे रुग्ण आढळले होते. तसेच गेल्या 3 जानेवरीला म्हणजेच सोमवारी 12160 रग्ण आढळले होते.तर 4 जानेवरीला म्हणजे गेल्या मंगळवारी कोरोनाच्या 18 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. तर, 20 रुग्णांचा मृत्यू झाला होता. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 66 हजार 308 वर पोहचली होती. तर, रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्क्याच्या खाली घसरला होता. याशिवाय, 5 जानेवरीला दिवसभरात कोरोनाच्या 26 हजार 538 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 5 हजार 331 रुग्ण बरे झाले होते. तर कोरोनामुळं 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच 6 जानेवरी म्हणजेच गुरवारी राज्यात कोरोनाच्या

मुंबई महापालिका मुख्यालय कोरोना हॉटस्पॉट -

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पालिका मुख्यालयात ( BMC ) ताप, सर्दी, खोकला झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत गेल्या आठवडाभरात वाढ झाली आहे. त्यातच मागील आठवड्यात रोज 4 ते 5 कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यामुळे पालिका मुख्यालय कोरोनाचा हॉटस्पॉट ( BMC Becomes Corona Hotspot ) बनत असल्याचे दिसत आहे. कोरोना नियम न पाळल्याने पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कोरोनाचा प्रसार वाढल्याचे दिसत आहे.

राज्यातील 260 डॉक्टर बाधित -

गेल्या 3 दिवसांत मुंबईतील विविध रुग्णालयांतील एकूण 260 निवासी डॉक्टरांची (260 Resident doctors tested positive for COVID-19) कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने दिली आहे. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे.

राज्य सरकारचे नवीन निर्बंध -

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन निर्बंध ( Maharashtra Govt issues fresh restrictions ) लागू केले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक ( RTPCR test for Maharashtra Journey ) असणार आहे. दुकानात, मॉलमध्ये, कार्यक्रमात जाण्यासाठी कोरोना लशींचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. चित्रपटगृह, नाट्यगृह, विवाह समारंभाचे हॉल आदी ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाकरिता क्षमतेच्या फक्त 50 टक्के परवानगी मिळणार आहे.

ओमायक्रॉनसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा -

जगभरातल्या अनेक देशांत ओमायक्रॉनची संसर्ग पसरला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO on Omicron) ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करू नका, गांभीर्यानं घ्या असा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होतायत आणि अनेकांचा जीवही जातोय असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस यांनी दिला. लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होतेय, पण अशा रुग्णांना त्याचा धोका कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा - Covid Outbreak In Maharashtra : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक.. 24 तासांत 36 हजार जण पॉझिटिव्ह

Last Updated : Jan 7, 2022, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.