मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा, यासाठी 24 मार्चपासून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे सर्व लोक 14 एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहेत. २१ दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपायला अजून सात दिवस शिल्लक आहेत. मात्र, देशातील लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असला, तरिही महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी लांबणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.
काय म्हटले आरोग्यमंत्री राजेश टोपे ?
लॉकडाऊनच्या बाबतची निर्णय प्रक्रिया 10 एप्रिलनंतर सुरु होईल. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असून तो पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जाऊ शकतो. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे '१५ एप्रिलपासून लॉकडाऊन संपूर्णपणे शिथिल होईल, असे कोणीही गृहित धरू नये' असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... कोरोनाचा विळखा : धारावीत आढळले दोन नवे रुग्ण, परिसर 'सील'
आज राज्यात 23 नवीन कोरोनाबाधित रुग्ण :
- मुंबई - 10
- सांगली - 1
- पुणे - 4
- अहमदनगर - 3
- बुलढाणा - 2
- ठाणे - 1
- नागपूर - 2
आज आढळलेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 891 वर पोहचली आहे.