ETV Bharat / city

कोरोना योद्ध्यांना ५० लाखाचे सानुग्रह अनुदान मिळणार; राज्य शासनाने दिली मुदतवाढ

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचे सानुग्रह अनुदान दिले जात होते.

author img

By

Published : May 14, 2021, 5:51 PM IST

mantralaya
संग्रहित फोटो

मुंबई - कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचे सानुग्रह अनुदान दिले जात होते. डिसेंबर २०२० ला या अनुदानाला स्थगिती देण्यात आली. मात्र, आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने सानुग्रह अनुदानाला ३१ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधित कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - गोव्यात मे महिन्यात ऑक्सिजन अभावी 454 जणांचा मृत्यू ; 24 तासांत 76 दगावले

कोरोना योद्ध्यांना मिळणार सानुग्रह अनुदान

गेल्यावर्षीपासून कोरोनाचा फैलाव सुरु आहे. त्याला रोखण्यासाठी कडक उपाययोजना सुरु आहेत. रुग्णांचे सर्वेक्षण, शोध, मार्ग काढणे, प्रतिबंधनात्मक उपाययोजना, चाचणी, उपचार, मदतकार्य अशा अनेक जबाबदाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. महामारीत शासकीय, खासगी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचे सानुग्रह देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. विशेष बाब म्हणून डिसेंबर २०२० पर्यंत अनुदान देण्यात येत होते. कालांतराने कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने अनुदानाला स्थगिती दिली. मार्चमध्ये कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी त्याविरोधात रात्रंदिवस लढा देत आहेत. कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सानुग्रह अनुदानाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२० ते ३१ जून २०२१ पर्यंत ही मुदतवाढ असेल, असे शासनाने म्हटले आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाने यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे.

हेही वाचा - ऑक्सिजनअभावी रूग्णांचा मृत्यू, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह तिघांविरुद्ध पोलिसात मनुष्यवधाची तक्रार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.