ETV Bharat / city

Ferry Boat Journey lifetime Free : 'त्या' डॉक्टर-नर्सेसना आयुष्यभर अरबी समुद्रातून निःशुल्क प्रवास!

डॉक्टर -नर्सेसना (Doctors and Nurses) मुंबईतील फेरी बोटवाल्यांनी (Ferry) खरोखर कोविड योद्धा (Corona Warriors) म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. फेरी बोटवाल्यांनी रेवस (Revas Ferry) आणि मोरामध्ये (Mora Ferry) राहणाऱ्या डॉक्टर -नर्सेसला त्यांच्या वैद्यकीय सेवेतील निवृत्तीपर्यत निःशुल्क अरबी समुद्रातून प्रवासाची मुभा दिली आहे.

Ferry Boat
समुद्रातील फेरी बोट
author img

By

Published : Jan 22, 2022, 8:46 PM IST

Updated : Jan 22, 2022, 9:07 PM IST

मुंबई - आपल्या जीवाची पर्वा न करता जे जीवनाच्या रणांगणावर कोविड (Covid Pandemic) महामारीशी लढले आणि अनेकांचे आयुष्य रक्षिले, त्या शूर डॉक्टर -नर्सेसना (Doctors and Nurses) मुंबईतील फेरी बोटवाल्यांनी (Ferry) खरोखर कोविड योद्धा (Corona Warriors) म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. फेरी बोटवाल्यांनी रेवस (Revas Ferry) आणि मोरामध्ये (Mora Ferry) राहणाऱ्या डॉक्टर -नर्सेसला त्यांच्या वैद्यकीय सेवेतील निवृत्तीपर्यत निःशुल्क अरबी समुद्रातून प्रवासाची मुभा दिली आहे. इतकेच नव्हे तर, दिव्यांग प्रवासी आणि मासळी विकणाऱ्या दिव्यांग कोळी महिलांना आयुष्यभरासाठी मुंबई -रेवस व मोरा -मुंबई मार्गावरील जलवाहतूक प्रवास निःशुल्क करण्यात आलेला आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट...

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
  • डॉक्टर -नर्सेसना मोठा दिलासा-

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने अचानक लॉकडाउन लावला होता. परिणामी संपूर्ण देशाची रेल्वे वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक ठप्प करण्यात आली होती. पहिल्या लाटेत तर मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, या कोरोनासारख्या अदृश्य संकटाशी जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यासारख्या हजारो कोरोना योद्धे जीवाची पर्वा न करता अविश्रांत काम करत होते. घरापासून हॉस्पिटल/कार्यालयापर्यंत सुखरूप ने-आण करण्याचे काम बेस्ट बसेस, एसटी बसेस करत होत्याच. तेव्हा मुंबईतील जे.जे रुग्णालय, कामा रुग्णालय, के.एम रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, नायर रुग्णालयात काम करणाऱ्या काही डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी रेवस आणि मोराला येथे राहात होत्या. मोरावरून येण्यासाठी काही साधन नसल्याने त्यांची मोठी पंचायत व्हायची. रेल्वे आणि बसेसने तासोंतास जायचे, मात्र, त्यांच्या मदतीला कोरोना काळात भाऊचा धक्कावरील फेरी बोट मालक धावून आले आहेत. या फेरी बोट मालकांनी मुंबई -मोरा व मुंबई - रेवस मार्गावरील या कोविड योद्धांसाठी निःशुल्क जल वाहतूक सुरु ठेवली होती. त्यामुळे रेवस आणि मोरामध्ये राहणाऱ्या डॉक्टर -नर्सेस यांना मोठा दिलासा मिळाला होता.

Ferry Boat
समुद्रातील फेरी बोट
  • या कारणामुळे निवृत्तीपर्यत निःशुल्क प्रवास -

मुंबई जलवाहतूक आणि औद्योगिक सहकारी संस्थेचे सचिव शराफत मुकादम यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, लॉकडाऊन काळात प्रवासी नसल्याने मुंबई -मोरा व मुंबई - रेवस मार्गावरील फेरी बोटी आम्ही बंद केल्या होत्या. मात्र, रेवस आणि मोरामध्ये राहणाऱया काही डॉक्टर -नर्सेस ज्या जे.जे रुग्णालय, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, कामा रुग्णालय, के.एम रुग्णालय, नायर रुग्णालय येथे काम करत होत्या, त्यांच्या सुविधेसाठी आम्ही फेरी बोटी सुरु केल्या होत्या. या कोविड योद्धांना आम्ही निःशुल्क प्रवास देत होतो. डॉक्टर -नर्सेसच्या कार्यालय वेळेवर आम्ही त्यांच्यासाठी विशेष फेरी बोट चालवत होतो. या बोटी चालवण्यासाठी आम्हाला साडे तीन ते चार हजार रुपयांचे इंधन लागत होते. मात्र, कोरोना सारख्या भयंकर महामारीत या खऱ्या कोविड योद्धानी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा, धैर्याचा, शौर्याचा, शर्थिंचा गौरव म्हणून मोरा आणि रेवसमध्ये राहणाऱ्या डॉक्टर -नर्सेसना आम्ही मुंबई ते मोरा दरम्यानचा फेरी बोटीचा प्रवास रुग्णालयातून निवृत्ती होईपर्यत निःशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे.

Ferry Boat
समुद्रातील फेरी बोट

हेही वाचा - ठरलं..! 15 मार्चपासून सुरू होणार रो-रो सेवा, जाणून घ्या प्रवासी क्षमता

  • या प्रवाशांना आयुष्यभर निःशुल्क प्रवास -

शराफत मुकादम यांनी सांगितले की, भाऊचा धक्कावर सकाळी मासळी विकणाऱ्या काही दिव्यांग कोळी महिला रेवस आणि मोरावरून येतात. त्यांना आम्ही आयुष्यभरासाठी फेरी बोटीचे तिकीट माफ केले आहे. याशिवाय फेरी बोटीतून प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांनासुद्धा आयुष्यभर निःशुल्क प्रवास दिला जात आहे. कोरोनामुळे गेला दोन वर्षांपासून खासगी कार्यालयातील कर्मचारी वर्क फॉर्म होम असल्याने आणि पर्यटकांची संख्या कमी असल्याने फक्त ३० टक्के क्षमतेने फेरी बोटी धावत आहेत. राज्य सरकारने ज्यापद्धतीने बेस्ट, एसटी, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मदत केली त्याचपद्धतीने आम्हाला पण मदतीची गरज आहे. राज्य सरकारने आमच्याकडून आकारण्यात येणारा जलवाहतुकीचा कर कमी करावा ही अपेक्षा देखील शराफत मुकादम यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली आहे.

Ferry Boat
समुद्रातील फेरी बोट
  • .....कोविड योद्धानी मानले आभार -

नायर रुग्णालयातील स्टाफ नर्स गीता पाडावे यांनी सांगितले की, कोविड काळात आमची फार गैरसोय होत होती. रुग्णालयात पोहचण्यासाठी आम्हाला रेल्वे आणि बसने तासोंतास लागायचे. मात्र, फेरी बोट मालकांनी सामाजिक भान राखत आमच्यासाठी सेवा सुरु केली. त्यामुळे आमचा प्रवासाचा त्रास कमी झालेला आहे. विशेष म्हणजे आम्हाला फेरी बोटीतून निःशुल्क प्रवास दिल्याने आम्ही फेरी बोटवाल्यांचे आभारी आहे. जे.जे रुग्णालयातील परिचारिका वर्षा सागर सोनकर यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, लॉकडाऊनमुळे आम्हाला रुग्णालयात रस्ते मार्गानी पोहचण्यासाठी तीन ते साडे तीन तास लागत होते. मात्र, जेव्हापासून फेरी बोटी आमच्यासाठी सुरु झाल्या तेव्हापासून आमचा प्रवास सुखर आणि वेळेची बचत झाली आहे. विशेष म्हणजे आम्हाला फेरी बोटीचे निःशुल्क पास देण्यात आल्यामुळे खऱ्या अर्थाने फेरी बोटवाल्यांचे आभारी आहे.

Ferry Boat
समुद्रातील फेरी बोट
  • फेरी बोटीचे काय आहे भाडे?

भाऊचा धक्का ते मोरा दरम्यान फेरी बोटीचे सिंगल तिकीटचे दर ८० रुपये आणि रिटर्न तिकीट दर १६० रुपये आहेत. तर भाऊचा धक्का ते मोरा दरम्यानचा फेरी बोटीचा मासिक पास हा ३ हजार रुपये आहे. भाऊचा धक्का ते रेवस दरम्यान फेरी बोटीचे सिंगल तिकीटचे दर १०० रुपये आणि रिटर्न तिकीट दर २०० रुपये इतके आहेत.

हेही वाचा - भाऊचा धक्का ते मांडवा 'रोरो बोटी'ची चाचणी सुरू, 'प्रोटो प्रोसेस' मांडवा बंदरात

Last Updated : Jan 22, 2022, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.