ETV Bharat / city

Corona Virus Highlights In Mumbai : मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार वाढला, पालिकेची यंत्रणा सज्ज - कोरोना विषाणू

मुंबईत गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूचा प्रसार असून डिसेंबरपासून या प्रसारात वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. (Corona Virus Highlights In Mumbai) रुग्णसंख्या वाढल्याने ( Active Corona Patients of Mumbai ) पालिका सज्ज असून काळजी घेणे आणि सुविधा पुरवणे या दोन आघाड्यावर काम करत आहोत.

(फाईल फोटो)
(फाईल फोटो)
author img

By

Published : Jan 4, 2022, 7:31 AM IST

Updated : Jan 4, 2022, 8:19 AM IST

मुंबई - मुंबईत गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूचा प्रसार असून डिसेंबरपासून या प्रसारात वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने ( Active Corona Patients of Mumbai ) पालिका सज्ज असून काळजी घेणे आणि सुविधा पुरवणे या दोन आघाड्यावर काम करत आहोत. येत्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढल्यास त्यासाठी बेडस, ऑक्सिजन, औषधांसह पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली (Omicron variant In Mumbai) असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया देताना अधिकारी

अशी घेतली जातेय काळजी -

रुग्णसंख्या आणि पॉजिटिव्हिटी रेट वाढत आहे. साधारण आठ हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रसार होणार नाही. सध्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने काळजी घेणे आणि सुविधा पुरवणे या दोन आघाड्यावर काम करत आहोत. कोरोनाचा प्रसार होऊ नये याची काळजी म्हणून चाचण्यांची संख्या संख्या वाढवणे, लोकांवर बंधने आणणे, रुग्ण आढळून येणाऱ्या झोपडपट्ट्या, मजले, इमारती सील करणे, होम क्वारंटाईन आणि हायरिस्क संपर्कातील लोकांच्या चाचण्या करणे, लक्षणे आढळून आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

पालिका यंत्रणा सज्ज -

नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी सुमारे ३० हजार बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी ३५०० बेडवर रुग्ण आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, खाटा पुरेशा आहेत. रुग्ण वाढल्यास त्यांना त्याठिकाणी ऍडमिट करता येईल. सध्या लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आहेत. ५ टक्के रुग्ण मध्यम लक्षणे असलेले असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा डिसेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या वाढली असली तरी मृत्यू दर कमी आहे. तरीही पालिका प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवली असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

दिवसाला ८ हजार रुग्ण -

मुंबईत रविवार (दि. २ जानेवारी) ८ हजार ६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख ९९ हजार ५२० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५० हजार ७३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १६ हजार ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २९ हजार ८१९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १८३ दिवस इतका आहे. मुंबईमधील २०३ इमारती आणि ९ झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. २६ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.३८ टक्के इतका आहे.

९० टक्के बेड रिक्त -

मुंबईत काल रविवारी आढळून आलेल्या ८ हजार ६३ रुग्णांपैकी ७ हजार १७६ म्हणजेच ८९ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. आढळून आलेल्या रुग्णांपैकी ५०३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ५६ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३० हजार ५६५ बेड्स असून त्यापैकी ३ हजार ५९ बेडवर म्हणजेच १० टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९० टक्के बेड रिक्त आहेत.

हेही वाचा - गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करणार - संजय राऊत

Last Updated : Jan 4, 2022, 8:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.