ETV Bharat / city

कोरोना प्रतिबंधक लस मुंबईकरांना मोफत देणार - किशोरी पेडणेकर - Corona vaccine news mumbai

कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार झाला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी लस हा एकमेव पर्याय आहे. कोरोना विषाणूवर लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही लस सर्वप्रथम कोरोना योद्धा म्हणजेच डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना देण्यात येणार आहे. मुंबईकरांना ही लस मोफत देण्यात येईल अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

Corona vaccine will be given free to Mumbaikars
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Dec 6, 2020, 3:12 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार झाला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी लस हा एकमेव पर्याय आहे. कोरोना विषाणूवर लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही लस सर्वप्रथम कोरोना योद्धा म्हणजेच डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना देण्यात येणार आहे. मुंबईकरांना ही लस मोफत दिली जाणार आहे. डब्ल्यूएचओ आणि भारतीय लसीकरणबाबतच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोनावरील लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

कोरोना विषाणूवरील लस लवकरच उपलब्ध होणार असून, ती ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथील परिवार संकुलाच्या जागेची निवड जवळपास निश्चित करण्यात आली आहे. या जागेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. या भेटीनंतर मुंबईकरांना ही लस मोफत देणार असल्याचे माहापौरांनी सांगितले.

तीन विभागात कोरोना लसीची साठवणूक

मुंबईत कोरोनाला प्रतिबंध करणारी लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र ही लस मुंबईत आल्यानंतर तिची साठवणूक करण्यासाठी शहरी भागातील एफ दक्षिण, पश्चिम उपनगरात गोरेगाव आणि पूर्व उपनगरात कांजूरमार्ग येथील पालिका संकुलात सोय करण्यात आल्याची माहितीही यावेळी महापौरांनी दिली.

कांजूरमार्गला मध्यवर्ती साठवणूक केंद्र

कांजूरमार्ग येथे पालिकेच्या ६ मजली इमारतीतील तीन मजले हे आरोग्य सुविधा देण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट जागेत लस साठवणूक केंद्राची म्हणजे कोल्ड स्टोरेजची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी डिसेंबरपर्यंत टेंडर काढण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात या ठिकाणी कोरोनावरील लस साठवणूक करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. फेब्रुवारी - मार्चपर्यंत लस साठवणूक केंद्र कार्यान्वित करण्याचा विचार आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

१.२० कोटी लसीचे डोस ठेवण्याची क्षमता

कांजूरमार्ग येथीप प्रस्तावित लस साठवणूक केंद्रात २ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानात लस साठवून ठेवण्यात येणार आहे. ४० क्यूबिक मीटरचे २ उपकरणे बसविण्यात येणार आहेत. तसेच, एक वजा १५ ते २५ डिग्री तापमान राखत असलेले एक २० क्यूबिक मिटरचे एक उपकरण (वॉक इन फ्रीज) बसविण्यात येणार आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये कोरोनावरील १.२० लाख डोस लसीचा आवश्यक साठा ठेवण्याची व्यवस्था असणार आहे, अशी माहितीही सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप यांनी दिली.

विजेच्या बचतीसाठी सौर ऊर्जेचा वापर

कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येणाऱ्या लसीवर सुर्यप्रकाशाचा विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विजेची बचत व्हावी, यासाठी या इमारतीच्या गच्चीवर सोलर पॅनल लावून त्याद्वारे साठविण्यात येणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे ५० टक्के विजेची बचत करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी डॉ. शीला जगताप यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.