मुंबई - कोरोनाच्या लसीसाठी लोकं हतबल झाले आहेत, त्यावेळी मुंबईस्थित ट्रॅव्हल कंपनी 'जेम टूर्स ट्रॅव्हल' यांनी कोरोनाची लस मिळवण्यासाठी इच्छा असलेल्यांसाठी 'वॅक्सिन टुरिजम' पॅकेज बनवले आहे. तीन दिवस आणि चार रात्रीचे पॅकेज मुंबई ते न्यूयॉर्कसाठी ग्राहकांना 1 लाख 74 हजार 999 रुपये द्यावे लागतील. ज्यामध्ये विमान भाडे आणि हॉटेल मुक्काम समाविष्ट आहे.
ट्रॅव्हल कंपनीने फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन भागीदार बायोटेक या कंपन्यांचा कोरोना व्हायरस लसीसाठी वापर करण्यात येत आहे. अमेरिकन माध्यमांतील वृत्तानुसार 13 डिसेंबरपासून काही निवडक अमेरिकन लोकांना लसीची पहिली फेरी देण्यात येणार आहे. फायझर कंपनी आणि तिची जर्मन भागीदार बायोटेक यांनी आपल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी यूएस फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनला अर्ज सादर केला आहे. फायझर-बायोटेक आणि मॉडर्नाच्या कोरोना व्हायरस लसींमध्ये 90 टक्क्यांहून अधिक प्रभावीपणाचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन औषध निर्माता आणि भागीदार बायोटेक एसईने नोंदवले आहे की, आतापर्यंत कोणत्याही चाचणीत कोणतीही सुरक्षा समस्या पाहिली गेली नाही ज्यात सुमारे 44 हजार रुग्ण सहभागी होते. तसेच त्यांची लस सर्व वयोगटातील लोकांचा इलाज करू शकते.