ETV Bharat / city

Corona Vaccine Booster Dose : मुंबई-पुण्यात फ्रंटलाईन कर्मचारी, जेष्ठांच्या बुस्टर डोसला सुरुवात - Booster dose marathi news

मुंबईत आजपासून कोरोना लसीकरणाच्या बुस्टर डोसला सुरुवात ( Mumbai Booster Dose ) झाली आहे. महापालिका, सरकारी आणि खासगी केंद्रावर हा डोस मिळणार ( Mumbai Booster Dose Center ) आहे. सहव्याधी असलेल्या नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे आवश्यक आहे.

Corona Vaccine Booster Dose
Corona Vaccine Booster Dose
author img

By

Published : Jan 10, 2022, 3:22 PM IST

Updated : Jan 10, 2022, 7:25 PM IST

मुंबई / पुणे - आजपासून लसीकरणाच्या बुस्टर डोसला सुरुवात ( Corona Vaccine Booster Dose ) झाली आहे. मुंबईसह सर्व राज्यातील फ्रंटलाईन कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, गंभीर आजार असणारे 60 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानुसार आजपासून पालिका, सरकारी आणि खासगी केंद्रांवर बूस्टर डोस देण्यास प्रारंभ झाला आहे.

वयोवृद्धांना डॉक्टरांच्या सल्ल्याने लस

दुसरी मात्रा घेतल्यापासून 9 महिने किंवा 39 आठवडे पुर्ण झाल्यास ते बुस्टर डोस घेण्यास पात्र असतील. 60 वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीकरण ( Seniors Booster Dose ) करण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. मात्र, या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे आवश्यक आहे. तसेच, सरकारी व खासगी लसीकरण केंद्रावर ऑनलाइन नोंदणी व थेट नोंदणी ( Booster Dose Online And Offline Registration ) करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

जेष्ठांच्या बुस्टर डोसला सुरुवात

सरकारी केंद्रांवर मोफत लस

सरकारी आणि महापालिका केंद्रावर सर्वांना विनामूल्य लसीकरण केले जाणार आहे. पण, ज्या नागरिकांनी यापुर्वी खासगी लसीकरण केंद्रावर लस घेतली आहे, त्यांना केंद्र सरकारने ठरवलेल्या किंमतीतच लस मिळणार आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नोकरी ठिकाणाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र गरजेचे

60 वर्षापेक्षा कमी ज्या फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनी याआधी लस घेताना कोविन ॲपवर कर्मचारी ऐवजी नागरिक अशी वर्गवारी केली आहे. त्यांना सरकारी आणि महापालिका केंद्रावर थेट येवून नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी नोकरीच्या ठिकाणाचे प्रमाणपत्र अथवा ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

पुण्यात बूस्टर डोसला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपासून लसीकरण आणि बुस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार देशात 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. (Booster Doses For Frontline Workers, Seniors Begin Today) तसेच, (दि. 10 जानेवारी) (Booster Dose Started In Pune) आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंन्टलाइन वर्कस आणि ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यासही सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातही मोठ्या प्रमाणात बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी आढावा घेतला आहे.

नेहरू रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांची बूस्टर डोससाठी सकाळपासून गर्दी

सध्या देशभरात लसीकरण मोठ्या वेगाने सुरू आहे. (Narendra Modi) सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहे. तसेच, अनेक देशात बुस्टर डोसही देण्यात येत आहे. (Vaccination In Pune) आता भारतातही आजपासून बुस्टर डोस देण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी फ्रंन्टलाइन वर्कर यांच्यासह 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. पुणे शहरात आज पासून बूस्टर डोसला सुरुवात झालेली आहे. शहरातील 179 केंद्रावर प्रत्येकी दीडशे त्यातही 25% ऑनलाइन तर 25 टक्के ऑफलाइन अशा पद्धतीने बूस्टर डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातील कमला नेहरू रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.

शहरात 179 केंद्रावर सुरू आहे लसीकरण

पुणे शहरातही लसीकरणाला सुरवात झाली असून शहरात तब्बल 179 केंद्रावर 25 टक्के ऑफलाईन तर 25 टक्के ऑनलाईन अशा स्वरूपात बुस्टर डोस देण्यात येत आहे. ज्यांनी दुसऱ्या लस घेऊन 39 आठवडे किंवा 9 महिने झाले अशा ज्येष्ठ नागरिकांनाच बुस्टर डोस देण्यात आहे. त्याच बरोबर ज्या नागरिकांनी कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतली आहे अशांना त्या-त्या प्रमाणेच लस दिली जात आहे.

मनात भीती होती

सध्या वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता मनात भीतीचे वातावरण होते. कधी बुस्टर डोस मिळेल याबाबत अनेक प्रश्न होते. दुसरा डोस घेऊन खूप वेळ झाला होता म्हणून मनात भीती होती. पण आज बुस्टर डोस मिळाल्याने आनंद होत आहे. अशी भावना देखील यावेळी काही नागरिकांनी व्यक्त केली. तर, आजपासून सुरू झालेल्या बुस्टर डोसला ज्येष्ठ नागरिकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.

हेही वाचा - Corona Restrictions In Maharashtra : मंत्रालयाचा कारभार पुन्हा ५० टक्क्यांवर, दोन शिफ्टमध्ये होणार कामकाज

Last Updated : Jan 10, 2022, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.