ETV Bharat / city

मुंबईतील सोमैया महाविद्यालयात आजपासून लसीकरण; काल 32 कॉलेजमधील 3920 विद्यार्थ्यांनी घेतली लस - vaccination K J Somaiya collage etvbharat

शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक गतीने व्हावे यासाठी पालिकेने महाविद्यालयांमध्ये लसीकरणाचा स्पेशल ड्राईव्ह सुरू केला आहे. आज घाटकोपर येथील के.जे. सोमैया या महाविद्यालयामध्ये पालिकेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

vaccination K J Somaiya collage etvbharat
मुंबई महाविद्यालय लसीकरण मोहीम
author img

By

Published : Oct 26, 2021, 5:14 PM IST

मुंबई - शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक गतीने व्हावे यासाठी पालिकेने महाविद्यालयांमध्ये लसीकरणाचा स्पेशल ड्राईव्ह सुरू केला आहे. आज घाटकोपर येथील के.जे. सोमैया या महाविद्यालयामध्ये पालिकेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

माहिती देताना पालिका अधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य

हेही वाचा - मंत्रालयातील इंटरनेट सेवा खंडित

राज्यातील विविध विद्यापीठे, त्याअंतर्गत येणाऱ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ ते २५ वर्षे वयोगटांतील प्रत्येक विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने 'मिशन युवा स्वास्थ्य' या मोहिमेची सुरुवात केली आहे. काल मुंबईतील ३२ कॉलेजमध्ये पार पडलेल्या मोहिमेत 3 हजार 920 विद्यार्थ्यांनी लस घेतली. विद्याविहार येथील सोमैया महाविद्यालयात या मोहिमेची आजपासून सुरुवात झाली आहे. आज या महाविद्यालयामध्ये 700 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्याबरोबरच उद्या देखील सातशे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

प्रत्यक्ष कॉलेज सुरू करताना ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही लसमात्रा घेतल्या आहेत, त्याच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येता येणार आहे. यामुळे केवळ लस घेतली नाही म्हणून प्रत्यक्ष कॉलेजला येता आले नाही, असे होऊ नये, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरण महत्त्वाचे असल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

एन विभाग पालिका हद्दीमध्ये मिशन स्वास्थ अंतर्गत अभियान सुरू करण्यात आले आहे. पुढील दहा दिवसांमध्ये चार ते पाच हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे ध्येय आमच्या समोर आहे. त्याचबरोबर विविध टप्प्यांचा वापर करून अधिक लसीकरण व्हावे, याचे देखील नियोजन करणार आहोत, असे एन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनावणे यांनी सांगितले.

मुंबई युनिव्हर्सिटीकडूही लसीकरणाची मोहीम

मुंबई युनिव्हर्सिटीकडून लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार 16 महाविद्यालयातील 3 हजार 920 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पण, लसीकरणाचा आकडा पुढील काही दिवसांत वाढेल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. काही महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे, त्यांना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी होता येत नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले.

हेही वाचा - आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस बंधनकारक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.