ETV Bharat / city

लसीकरणाचा मुंबईत एक लाखाचा टप्पा पार

author img

By

Published : Feb 11, 2021, 10:01 PM IST

मुंबईत आज 23 लसीकरण केंद्रांवर 125 बूथवर 3,825 आरोग्य कर्मचारी तर 5,550 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 9, 375 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 1, 989 आरोग्य कर्मचारी तर 3,718 फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण 5,707 जणांना लस देण्यात आली.

कोरोना लसीकरण मोहीम
कोरोना लसीकरण मोहीम

मुंबई - कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर असलेल्या 5,707 आरोग्य कर्मचाऱ्यांना आज मुंबईत लस देण्यात आली.तर राज्यात एकूण 1 लाख 01 हजार 364 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मुंबईने आज लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. राज्यात 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 23 लसीकरण केंद्रांवर 125 बूथवर 3,825 आरोग्य कर्मचारी तर 5,550 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 9, 375 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 1, 989 आरोग्य कर्मचारी तर 3,718 फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण 5,707 जणांना लस देण्यात आली. आज 11 जणांना लसीचे सौम्य दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मुंबईत आतापर्यंत 1 लाख 1 हजार 664 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

असे करण्यात आले लसीकरण-

आतापर्यंत 1,01,364 लसीकरण करण्यात आले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत कस्तुरबा हॉस्पिटल 478 , मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 12734 , भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 789 , परळ येथील केईएम रुग्णालयात 12459 , सायन येथील टिळक रुग्णालय 6042 , सांताक्रूझ येथील व्ही . एन . देसाई रुग्णालय 1539 , बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 10355 लसीकरण करण्यात आले. तर बांद्रा भाभा हॉस्पिटल 4831 , सेव्हन हिल 5795 , विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 8615 , गोरेगाव नेस्को 3608 , एस के पाटील हॉस्पिटल 1093 , एम डब्लू हॉस्पिटल 674 , कांदिवली येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 12419 , दहिसर जंबो 1003 , भगवती हॉस्पिटल 746 , कुर्ला भाभा 145 असे लसीकरण करण्यात आले. सेंटेनरी गोवंडी हॉस्पिटल 1186 , बीएआरसी 917 , हॉस्पिटल 832 , घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 13074 , वीर सावरकर हॉस्पिटल 1001 , मुलुंड जंबो 1040 असे लसीकरण करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.