ETV Bharat / city

#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - delta variant

corona
corona
author img

By

Published : Jun 26, 2021, 6:34 AM IST

Updated : Jun 26, 2021, 9:04 PM IST

21:03 June 26

महाराष्ट्रात शनिवारी ९,८१२ नवीन करोना रुग्णांची नोंद, १५६ रुग्णांचा मृत्यू

मुंबई - राज्यात आज दिवसभरात ८ हजार ७५२ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ८१ हजार ५५१ इतका झाला आहे.आज राज्यात ९,८१२ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ८,७५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,८१,५५१ झाली आहे. तसेच राज्यात आज १७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.० टक्के आहे.

20:10 June 26

सांगलीत 87 रुग्ण मृत्यूप्रकरणी डॉक्टर भावासह दोघांना अटक..

सांगली - अँपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 रुग्ण मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर महेश जाधव याच्या डॉक्टर भावालाही अटक करण्यात आली आहे. मदन जाधव असे या डॉक्टर भावाचे नाव असून जाधव याच्यासह रुग्णालयातील एका ब्रदरलाही मिरज पोलिसांनी अटक केली आहे. मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटल मधील 87 कोरोना रुग्णांच्या मृत्यू प्रकरण तपासामध्ये अनेक गंभीर बाबी आता समोर येत आहेत. रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आतापर्यंत डॉक्टर महेश जाधव याच्यासह रुग्णालयातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

20:10 June 26

कोविड-१९ निर्बंधांबाबत राज्य सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जूनपासून निर्बंध लागू केले आहेत. लोकांमध्ये याबाबत अनभिज्ञता आहे. जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ, खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळाबाबत राज्य सरकारने निर्बंधांची नियमावली सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत उपलब्ध करून दिली आहे

20:09 June 26

मुंबई कोरोना अपडेट : 1919 रुग्णांना डिस्चार्ज; 648 नवे रुग्ण, 15 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज 648 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 19 हजार 610 वर पोहचला आहे. आज 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 383 वर पोहचला आहे. आज 1919 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 92 हजार 787 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 9 हजार 148 सक्रिय रुग्ण आहेत.  

17:13 June 26

कोविड इन्होवेशन पुरस्काराचे कल्याण-डोंबिवली व वाराणसी संयुक्त मानकरी..

कल्याण डोंबिवली महापालिकेला कोविड इन्होवेशन पुरस्कार

ठाणे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला केंद्र सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत केंद्र सरकारच्या वतीने वाराणसी आणि कल्याण डोंबिवली या शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे.

14:12 June 26

Covid 19 New Restrictions: आजपासून महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

मुंबई - महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळेही राज्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे राज्य सरकारडून नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली असून सर्व जिल्ह्यात आता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

09:57 June 26

देशात 48 हजार 698 नव्या रुग्णांची नोंद, 5 लाख 95 हजार सक्रिय रुग्णांवर सुरुएत उपचार

नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत 48,698 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 64,818 रुग्ण बरे झाले असून 1,183 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 3,01,83,143 झाली असून आतापर्यंत 3,94,493 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. सध्या देशात 5,95,565 सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

06:30 June 26

तिसर्‍या लाटेत महाराष्ट्रात 50 लाख नागरिक आणि 5 लाख बालके संक्रमित होतील - डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा - राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. तिसरी लाट आली तर राज्यात 50 लाख नागरिक संक्रमित होतील असा अंदाज व्यक्त होत आहे. या लाटेत जवळपास 5 लाख बालकांचा समावेश असेल, असा अंदाज अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला आहे. आज शुक्रवारी बुलडाण्यात ते आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

06:30 June 26

राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू... डेल्टा प्लस व्हेरिएंटचा महाराष्ट्रात अधिक धोका

मुंबई - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. नव्या व्हेरिएंटचे देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने आज नवीन सरकारी आदेश काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कडक निर्बंध लावण्याच्या निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे आजपासून राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत.

06:30 June 26

Covid 19 New Restrictions: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू, जाणून घ्या नवीन मार्गदर्शक सूचना

06:29 June 26

मुंबईत शुक्रवारी 79 हजार 721 लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या आठवड्यात तीन दिवस दररोज एक लाखाच्यावर लसीकरण झाले होते. त्यात काही प्रमाणात घट झाली असून शुक्रवारी (दि. 25 जून) 79 हजार 721 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 49 लाख 39 हजार 259 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

06:28 June 26

शुक्रवारी 693 नव्या रुग्णांची भर, 20 मृत्यूची नोंद

मुंबई - शुक्रवारी (दि. 25 जून) मुंबईत 693 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 20 मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 713 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत शुक्रवारी 693 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 20 हजार 339 वर पोहोचला आहे. शुक्रवारी 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 315 वर पोहोचला आहे. शुक्रवारी 575 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 92 हजार 245 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 437 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 713 दिवस इतका आहे.

06:13 June 26

राज्यात 9 हजार 677 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 156 रुग्णांचा मृत्यू

मुंबई - राज्यात मागील 24 तासांत 9 हजार 677 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 60 लाख 17 हजार 35 झाली आहे. शुक्रवारी (दि. 25 जून) 156 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 20 हजार 360 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झआला आहे.

Last Updated : Jun 26, 2021, 9:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.