मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. सोमवारी 2 हजार 026, मंगळवारी 2 हजार 401, बुधवारी 2 हजार 876 तर आज गुरुवारी 7 ऑक्टोबरला 2 हजार 681 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यूसंख्येतही वाढ होऊन 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 2 हजार 413 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
- 33,397 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 2681 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 70 हजार 472 वर पोहचला आहे. तर आज 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 411 वर पोहचला आहे. आज 2 हजार 413 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 94 हजार 75 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 97 लाख 66 हजार 957 नमुन्यांपैकी 65 लाख 70 हजार 472 नमुने म्हणजेच 11 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 39 हजार 587 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 33 हजार 397 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- मृत्यूसंख्येत चढउतार -
1 ऑक्टोबरला 50, 2 ऑक्टोबरला 49, 3 ऑक्टोबरला 41, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 7 ऑक्टोबरला 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
- मुंबई महापालिका - 453
- अहमदनगर - 376
- पुणे - 343
- पुणे पालिका - 138
- पिंपरी चिंचवड पालिका - 73
- सोलापूर- 129
- सातारा - 187
हेही वाचा -दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, टोपे यांनी घेतले महालक्ष्मी मातेचे दर्शन