ETV Bharat / city

विशेष : मुंबईत २३ दिवसानंतर पुन्हा झोपडपट्टी सील, कोरोनाचा प्रसार रोखण्याचे पालिकेपुढे आव्हान - कोरोना रुग्णसंख्या

मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. झोपडपट्ट्या, चाळी गेल्या २३ दिवसात सील झाल्या नव्हत्या. मात्र आता पुन्हा झोपडपट्टीत रुग्ण आढळून आल्याने कांदिवली आर साऊथ विभागात झोपडपट्टी सील करण्यात आली आहे.

corona third wave : Slum sealed again in Mumbai after 23 days
विशेष : मुंबईत २३ दिवसानंतर पुन्हा झोपडपट्टी सील, कोरोनाचा प्रसार रोखण्याचे पालिकेपुढे आव्हान
author img

By

Published : Sep 9, 2021, 9:04 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने रुग्णसंख्या कमी झाली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी नागरिक दाटीवाटीने राहतात, अशा विभागातील झोपडपट्ट्या, चाळी गेल्या २३ दिवसात सील झाल्या नव्हत्या. मात्र आता पुन्हा झोपडपट्टीत रुग्ण आढळून आल्याने कांदिवली आर साऊथ विभागात झोपडपट्टी सील करण्यात आली आहे. झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्याचे पालिकेपुढे आव्हान असणार आहे.

७ लाख ४७ हजार नागरिकांना कोरोना -
मुंबईमध्ये मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या एकूण ७ लाख ४७ हजार ६०८ रुग्णांची नोंद झाली आहे. या कालावधीत ७ लाख २५ हजार २४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १६ हजार ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार २५३ दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ३ हजार ८९५ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत सध्या दिवसाला ३०० ते ५०० नवे रुग्ण आढळून येत आहेत.

२३ दिवसात एकही झोपडपट्टी सील नाही -
मुंबईमध्ये फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या कमी होऊन दिवसाला १९० रुग्ण आढळून आले होते. याच दरम्यान १४ ऑगस्टपासून मुंबईत एकही झोपड्पट्टी सील झाली नव्हती. सलग ७ सप्टेंबरपर्यंत २३ दिवस एकही झोपडपट्टीत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित झालेली नव्हती. मात्र ८ सप्टेंबरला कांदिवली येथील आर साऊथ विभागात पहिली झोपडपट्टी सील झाली आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्याने येत्या काळात पुन्हा झोपडपट्ट्या सील होण्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

५० इमारती, १५६४ मजले सील -
मुंबईमधील पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेल्या ५० इमारती सील करण्यात आल्या आहेत. या ५० इमारतीमध्ये १४ हजार नागरिक राहत आहेत. तसेच एकाच मजल्यावर दोन पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असे १ हजार ५६४ मजले सील करण्यात आले आहेत. या १ हजार ५६४ मजल्यांवर २ लाख ५९ हजार नागरिक राहत आहेत. झोपडपट्टीपेक्षा मुंबईत अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

धारावीचा शून्याचा विक्रम, ८ अॅक्टिव्ह रुग्ण -
धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. धारावीत कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ला दुसर्‍यांदा, २६ जानेवारीला तिसर्‍यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा, २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. दुसऱ्या लाटेदरम्यान १७ वेळा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. दुसऱ्या लाटेत १४, १५, २३ जून तर ४, ७, १७ जुलैला एकही रुग्ण सापडला नव्हता. तर ऑगस्ट महिन्यात ३, ८, ११, १२, १५, १७, १८, २४, २७ तारखेला आणि ३ आणि ७ सप्टेंबरला एकही रुग्ण सापडला नव्हता. धारावीत आज ९ सप्टेंबरला ४ रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत एकूण ७ हजार ४१ रुग्णांची नोंद झाली असून ६ हजार ६२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीत सध्या ८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

झोपडपट्ट्या, चाळी हॉटस्पॉट -
मुंबईमध्ये ६० टक्के नागरिक झोपडपट्टी आणि चाळीत राहतात. या विभागात दाटीवाटीने लोक राहत असल्याने कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची भीती होती. या भीतीनुसार धारावी, वरळी कोळीवाडा आदी भागातील झोपडपट्ट्या आणि चाळी कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्या होत्या. मात्र पालिका प्रशासन, आरोग्य विभाग यांनी केलेल्या उपाययोजना आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेली साथ यामुळे झोपडपट्ट्या आणि चाळी कंटेनमेंट मुक्त झाल्या आहेत. या झोपडपट्ट्यामध्ये आता पुन्हा रुग्ण आढळून येऊ लागल्याने मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

काय आहे कंटेनमेंट झोन -
ज्या झोपडपट्टी आणि चाळीत कोरोनाचे रुग्ण आढळून येतात, त्याठिकाणी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून तो विभाग सील केला जातो. तसेच मुंबईत ज्या इमारतीमध्ये ५ पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येतात त्या इमारती सील केल्या जातात. ज्या इमारतीमध्ये एकाच मजल्यावर २ पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतात ते मजले सील केले जातात. त्या विभागातील नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर ये - जा करण्यास बंदी असते. अशा विभागावर आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाचे विशेष लक्ष असते. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांच्या विरोधात साथ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो.

पालिकेचे विशेष लक्ष -
मुंबईत सध्या इमारतींमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या इमारतींवर विशेष लक्ष दिले जात आहे. रुग्णांशी आरोग्य विभागातील कर्मचारी वेळोवेळी संपर्क ठेवत आहेत. सील केलेल्या इमारतींमधील रुग्ण आणि त्याच्या संपर्कांतील लोक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच झोपडपट्टी विभागात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सील झोपडपट्ट्या, इमारती -
कंटेनमेंट झोन (चाळी, झोपडपट्ट्या) - १
सील इमारती - ५०
सील मजले - १ हजार ५६४

हेही वाचा - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांची निर्दोष मुक्तता; अंजली दमानिया जाणार उच्च न्यायालयात

हेही वाचा - बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच आमचा प्रयत्न - महापौर किशोरी पेडणेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.