मुबंई - मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे. रेल्वे आणि हवाई मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मुंबईतल्या व्यस्त असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनल्स या ठिकाणी प्रवाशांची प्लॅटफॉर्मवरच अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे.
7 राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी
दिल्ली, केरळ, गोवा, ओरिसा, आसाम, उत्तराखंड, हावडा, विशाखापटनम, नेत्रावती, पुरी, हरिद्वार तसेच नागपूर मार्गे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जे प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत, त्या प्रवाशांना कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.