ETV Bharat / city

मुंबईतील रुग्णसंख्या घटली याचे श्रेय सर्वांना - महापौर किशोरी पेडणेकर - महापौर किशोरी पेडणेकर

आयसीएमआरने मुंबईतील रुग्ण संख्या घटल्याचे म्हटले आहे. याचे श्रेय सर्वांना आहे. लहान मुलांना कोरोनाचा धोका आहे, म्हणून स्पेशल वॉर्ड बनविले जाणार आहेत. लहान मुलांसाठी नवीन कोरोना वॉर्ड तयार करत आहोत अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.

मुंबईतील रुग्णसंख्या घटली याचे श्रेय सर्वांना - महापौर किशोरी पेडणेकर

author img

By

Published : May 4, 2021, 12:55 PM IST

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील रुग्णसंख्या घटल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. मुंबईतील रुग्णसंख्या घटल्याचे श्रेय सर्वांना असल्याचे मत शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे. लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याने त्यांच्यासाठी स्पेशल वॉर्ड बनविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याचे श्रेय सर्वांनाच
आयसीएमआरने मुंबईतील रुग्ण संख्या घटल्याचे म्हटले आहे. याचे श्रेय सर्वांना आहे. लहान मुलांना कोरोनाचा धोका आहे, म्हणून स्पेशल वॉर्ड बनविले जाणार आहेत. लहान मुलांसाठी नवीन कोरोना वॉर्ड तयार करत आहोत अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. देशात लोकशाही आहे, भाजपला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण हे आंदोलन कोणाच्या जीवावर उठलं नाही पाहिजे असेही त्या म्हणाल्या. केंद्रात तुमची सत्ता आहे, त्यामुळे तुम्ही लस उपलब्ध करून द्या असेही त्या म्हणाल्या.

महापालिका प्रशासनावरही नाराजी

महापौरांना महापालिकेच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नसल्याविषयीही पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली. सलग दोन कार्यक्रमात गोंधळ दिसून आल्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी निमंत्रण मिळण्याची वाट पाहत नाही पण कदाचित प्रशासनातील अधिकाऱ्यांना महापौरांना माहिती द्यायला वेळ नाही. असा टोला लगावत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.