ETV Bharat / city

दिलासादायक..! मुंबईतील आठ वॉर्डात रुग्ण दुप्पटीचा कालावधी 100 दिवसांहून अधिक

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार 24 वॉर्डपैकी 8 वॉर्डमधील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा 105 ते 145 दिवसांचा झाला आहे. यात एच पूर्व वांद्रे हा वॉर्ड आघाडीवर आहे.

author img

By

Published : Aug 10, 2020, 8:58 PM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मुंबई - कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असतानाच मुंबईकरांसाठी आणखी एक दिलासादायक बाब आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा गुणाकार काहीसा आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मुंबईमधील 24 पैकी 8 वॉर्डमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 100 दिवसांहून अधिक झाला आहे.

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार 24 वॉर्डपैकी 8 वॉर्डमधील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा 105 ते 145 दिवसांचा झाला आहे. यात एच पूर्व वांद्रे हा वॉर्ड आघाडीवर आहे. वांद्रे पूर्व ते सांताक्रूझ असा हा विभाग कोरोना नियंत्रणात, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत सुरुवातीपासून जूनपासून आघाडीवर आहे. आजच्या दिवशी या वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 145 दिवस आहे. येथे दररोज 12 ते 27 कोरोनाबाधित आढळतात. एच पूर्वनंतर के ईस्ट (अंधेरी पूर्व) मध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 133 दिवस आहे. येथे दरोरोज 30 ते 50 कोरोनाबाधित आढळतात. तिसऱ्या क्रमांकावर एल वॉर्ड
(कुर्ला) आहे. या वॉर्डमध्ये 122 दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. येथेही रोज सुमारे 30 ते 50 कोरोनाचे पॉझिटिव्ह व्यक्ती आढळतात.

एस विभाग अर्थात भांडूपचामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा दर 116 दिवस इतका आहे. येथे दररोज 30 ते 55 च्या दरम्यान कोरोनाबाधित आढळत आहेत. एस वॉर्डनंतर चेंबूर एम पूर्व विभागात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा 113 दिवस आहे. येथे रोज 20 ते 50 रुग्ण हे कोरोनाबाधित आढळतात. या पाठोपाठ के वेस्ट अर्थात अंधेरी पश्चिम विभागाचा कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 109 इतका आहे. येथे 20 ते 65 च्या दरम्यान रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.

एफ नॉर्थ अर्थात भांडूपचा रुग्ण दुप्पटीचे प्रमाण होण्याचा कालावधी 100 दिवसांच्या वर गेला आहे. येथे 20 ते 50 दरम्यान कोरोनाचे रुग्ण आढळतात. आठव्या क्रमांकावर मालाड अर्थात पी उत्तर वॉर्ड आहे. या वॉर्डमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 105 दिवसामध्ये दुप्पट झाली आहे. येथे रोज 30 ते 60 कोरोनाबाधित रुग्ण आढळतात. 8 वॉर्डमध्ये 100 दिवसांच्यावर रुग्णांची संख्या दुप्पटी होण्याचा कालावधी झाला आहे.

दोन वॉर्डमधील रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा 100 दिवसांच्या जवळ आहे. एन वॉर्ड (घाटकोपर) मध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण दुप्पट होण्यासाठी 95 दिवस लागले आहे. तर जी उत्तर (दादर) वॉर्डमध्ये 93 दिवसांत रुग्णांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. चार वॉर्डमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण हे 80 दिवसानंतर दुप्पट झाले आहे. चार वॉर्डमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवसांहून अधिक आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाला तर नक्कीच मुंबईत कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू करेल. दरम्यान, मुंबईमध्ये आजवर एकूण कोरोनाबाधितांपैकी 78 टक्के रुग्णांनी महामारीवर मात केली आहे.

राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के -
कोरोनाचा कहर राज्यात वाढतच आला आहे. रविवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या २४ तासात पुन्हा कोरोनाच्या १२ हजार २४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांनी दिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.