मुंबई- देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 18,815 नवीन रुग्ण आढळले ( India corona update today ) आहेत. त्यामुळे देशातील संक्रमित लोकांची संख्या 4,35,85,554 वर पोहोचली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,22,335 वर पोहोचली ( corona cases today ) आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी अपडेट केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. सकाळी 8 च्या अद्ययावत आकडेवारीनुसार, आणखी 38 बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 5,25,343 झाली ( corona patients deaths ) आहे.
मंत्रालयाने सांगितले की उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण प्रकरणांपैकी 0.28 टक्के आहे तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.51 टक्के आहे. 24 तासांच्या कालावधीत उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,878 ने वाढली ( Corona positivity rate ) आहे. मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत 4,38,005 नमुन्यांची तपासणी ( Corona tests ) करण्यात आली. दैनंदिन संसर्ग दर 4.96 टक्के होता तर साप्ताहिक संसर्ग दर 4.09 टक्के नोंदवला गेला.
198.51 कोटी डोस - या आजारातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या वाढून 4,29,37,87६ झाली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसीचे 198.51 कोटी डोस देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी देशात संक्रमित लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती.
25 जानेवारीला कोरोना रुग्णांची संख्या 4 कोटीहून अधिक-16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी देशात या प्रकरणांची संख्या एक कोटींहून अधिक झाली होती. गेल्या वर्षी, 4 मे रोजी, संक्रमितांची संख्या 20 दशलक्ष पार केली होती आणि 23 जून 2021 रोजी ती 30 दशलक्ष पार केली. यावर्षी 25 जानेवारीला या प्रकरणांनी चार कोटींचा आकडा पार केला होता.
मुंबईत गुरुवारी ५४० रुग्णांची नोंद - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले काही दिवस २ हजारावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर चाचण्यांची संख्या कमी केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. सलग सातव्या दिवशी एक हजारच्या खाली रुग्णसंख्या नोंद झाली आहे. गुरुवारी ५४० रुग्णांची नोंद झाली आहे. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ४१६ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
५.४३ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह - मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात ९ हजार ९२९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५४० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ५.४३ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. १२६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १७ हजार ३६७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९२ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ८७५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९४९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०७० टक्के इतका आहे.