ETV Bharat / city

Corona: मुंबईतल्या एच ईस्ट विभागातील परिस्थिती चिंताजनक; 71 जणांना कोरोनाची लागण

मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर एक चहाची टपरी होती येथील चहावाल्याकडे मातोश्रीतील सुरक्षारक्षक, इतर कर्मचारी चहा पिण्यासाठी जात होते. याच चहावाल्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

corona condition critical in east zone patient number increased
Corona: मुंबईतल्या एच ईस्ट विभागातील परिस्थिती चिंताजनक; 71 जणांना कोरोनाची लागण
author img

By

Published : Apr 13, 2020, 1:54 PM IST

मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री, कलानगर परिसर पालिकेच्या एच ईस्ट विभागात येते. या विभागातील परिस्थिती चिंताजनक आहे. एच ईस्ट विभागात आतापर्यंत 71 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामळे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचीही चिंता वाढली आहे.

मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर एक चहाची टपरी होती येथील चहावाल्याकडे मातोश्रीतील सुरक्षारक्षक, इतर कर्मचारी चहा पिण्यासाठी जात होते. याच चहावाल्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर पालिका आणि पोलीस प्रशासन कामाला लागले आणि कलानगरचा परिसर त्वरित सील करण्यात आला. महापालिकेकडून औषध फवारणीही करण्यात आली.

आठ दिवसा नंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त असून आतील एकही व्यक्ती बाहेर येऊ शकत नाही की बाहेरील कुठलीही व्यक्ती आत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. ही संख्या अशीच वाढत गेली तर ही प्रशासनासाठी नक्कीच चिंतेची बाब ठरेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.