ETV Bharat / city

Mumbai Corona : दिवाळी दरम्यान मुंबईत कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता; गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन - दिवाळीत मुंबई कोरोना वाढ

मुंबई मध्ये गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी होत असताना गेल्या आठ ते दहा दिवसात मुंबईमधील रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाच्या नव्या XBB, Omicron – BQ.1 (US variant), BA.2.3.20 या सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

corona
corona
author img

By

Published : Oct 18, 2022, 8:53 PM IST

मुंबई - मुंबई मध्ये गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी होत असताना गेल्या आठ ते दहा दिवसात मुंबईमधील रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाच्या नव्या XBB, Omicron – BQ.1 (US variant), BA.2.3.20 या सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. येत्या दिवाळी सणादरम्यान कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याचा इशारा राज्य सरकराने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकर नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे व कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता - ऑक्टोबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात कोविड-19 च्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आगामी दिवाळी आणि इतर सणांचा हंगाम लक्षात घेता हा एक गंभीर कालावधी आहे. मोठ्या मेळाव्यांमध्ये होणारी गर्दी, सणांमध्ये कोविड-नियमांकडे होणारे दुर्लक्ष, कार्यक्रम, जत्रा, बंदिस्त आणि हवेशीर नसलेल्या जागांवर होणारी गर्दी यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी सणासुदीच्या काळात कोविड नियमांचे पालन करावे. संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे. ज्यांना इतर आजार आहेत किंवा ज्यांनी कोरोनाचा प्रसार असलेल्या देशाना भेटी दिल्या असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी -
- सणासुदीच्या काळात कोविड नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
- कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले नसल्यास ते त्वरित करून घ्यावे. रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात आली असेल किंवा धोका असेल तर, बूस्टर व्हायरसपासून प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात. यासाठी ज्यांनी बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा.
- बंद खोल्यांमध्ये व्हायरस पसरण्यास मदत होते. यासाठी घरामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या.
- लक्षणे असलेल्या रुग्णांशी जवळचा संपर्क टाळा
- वारंवार हात धुणे..
- शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू पेपर वापरा.
- संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे महत्त्वाचे आहे.
- कोरोना लक्षणे दिसू लागताच चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे. रिपोएट येई पर्यंत स्वत: ला इतरांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून संक्रमणाची साखळी तोडता येईल.
- कोरोनाची लागण झाल्याचे लवकर माहिती झाल्यास उपचार किंवा हॉस्पिटलायझेशन वेळेवर करता येईल.
- ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, इम्युनोकॉम्प्रोमाइज केलेले रुग्ण आणि ज्यांनी नुकतेच कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या देशांना भेट दिली आहे अशा लोकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.