मुंबई - मुंबईसह राज्यात गेले दोन वर्षे कोरोना ( Corona In Maharashtra ) विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत राज्यात कोरोना विषाणूच्या तीन लाटा आल्या असून नागरिकांच्या सहकार्याने राज्य सरकार आणि महापालिकेने त्या लाटा थोपवल्या आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने राज्यातील निर्बंध शिथिल ( Relaxation In Covid Rules ) करण्यात आले आहेत. राज्यातील निर्बंध शिथिल केल्यावर काही दिवसात पुन्हा रुग्णसंख्येत ( Corona Cases In Creasing In Maharashtra ) वाढ दिसून आली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढते आहे - राज्यात ५ एप्रिलला कोरोनाचे १३६ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊ लागली. १० एप्रिलला ९० तर, १८ एप्रिलला ५९ रुग्ण आढळून आले. त्यानंतर गेल्या ३ दिवसांत पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात १९ एप्रिलला १०८, २० एप्रिलला १६२ तर, २१ एप्रिलला १७९ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ७८ लाख ७६ हजार ३८२ रुग्णांना कोरोनाचा संसंर्ग झाला आहे. त्यापैकी ७७ लाख २७ हजार ७८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४७ हजार ९३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे. सध्या ७६२ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईतही रुग्णसंख्येत वाढ - मुंबईत पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८००, तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून, ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. डिसेंबरपासून आलेली तिसरी लाट एका महिन्यात ओसरली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत होती. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, ४ एप्रिलला १८ रुग्ण आढळून आले. एप्रिलला रोज ५० हून कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र, त्यात वाढ होऊन ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ९ एप्रिलला ५५, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १७ एप्रिलला ५५, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत ९९ टक्क्याहून अधिक बेड रिक्त - मुंबईत आतापर्यंत एकूण १० लाख ५९ हजार ०७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३९ हजार ०६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४५० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के ( Mumbai Corona Recovery Rate ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२,६५९ दिवस इतका ( Mumbai Corona Doubling Rate ) आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे. मुंबईत ९९ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मुंबईमधील रुग्णालयांमध्ये २६ हजार ०४४ बेड्स असून, त्यापैकी १२ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक बेड रिक्त आहेत.
मुंबईमध्ये हे व्हेरियंट आढळून आले - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार सध्या कमी झाला असला तरी या कालावधीत कोरोना, अल्फा, केपा, नाइंटिन ए, द्वेन्टि ए, डेल्टा, डेल्टा डेरिव्हेटिव्ह, ओमायक्रोन, स्टेल्थ बी 2, एक्सई या व्हेरियंटचे रुग्ण मुंबईत आढळून आले ( Mumbai Corona Variants ) आहेत. पालिकेने केलेल्या उपाययोजना, नागरिकांनी दिलेली साथ यामुळे या सर्व व्हेरियंटवर मात करणे शक्य झाले ( Mumbaikars defeated various variants of Corona ) आहे.
केंद्राचा राज्य सरकारला सल्ला - कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने राज्य सरकारला केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि मिझोराम या पाच राज्यांना 'चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना नियमांचे योग्य पालन' या पाच-नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर विशेष भर देण्यात यावा, असही त्या पत्रामध्ये म्हटले आहे.
देशात कोरोनाची परिस्थिती - गेल्या 24 तासांत भारतात 2,451 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण कोरोनाचे 14,241 सक्रिय रुग्ण आहेत. सद्या देशात रिकव्हरी रेट 98.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी सकाळी IIT मद्रासच्या आणखी 18 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे येथील कोरोना बाधित विद्यार्थ्यांची संख्या 30 वर पोहोचली आहे.