ETV Bharat / city

दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत पर्यटकांचे मात्र 'सोशल डिस्टनसिंग' सुरूच - कोरोना पर्यटन क्षेत्राला फटका

मुंबईत देशातील सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले, त्यामुळे येथील पर्यटन क्षेत्राला त्याचा चांगलाच दणका बसला आहे. एकंदरीत दिवाळीसारख्या सणाच्या वेळी मुंबईत पर्यटकांची चांगलीच रेलचेल असते.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Nov 13, 2020, 8:15 PM IST

मुंबई - जगातील प्रमुख पर्यटन स्थळे पुन्हा एकदा उघडत आहेत आणि काही ठिकाणी पर्यटनाला वेग आला आहे. असे असूनही साथीच्या आजाराचा वाईट परिणाम पर्यटन उद्योगावरील कमी झालेला नाही. दरवर्षी देशात पर्यटनापासून चांगला महसूल जमा होणार्‍या बर्‍याच शहरांचा हा स्रोत मार्चपासून कोरडा पडला आहे. हीच परिस्थिती आहे मुंबईची.

मुंबई

मुंबईत देशातील सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले, त्यामुळे येथील पर्यटन क्षेत्राला त्याचा चांगलाच दणका बसला आहे. एकंदरीत दिवाळीसारख्या सणाच्या वेळी मुंबईत पर्यटकांची चांगलीच रेलचेल असते. मग प्रसिद्ध वरळी सिफेस असो की, जुहू चौपाटी मुंबई पर्यटकांचे स्वागत करण्यास तयार असते. मात्र, ह्या वर्षी कोरोना इफेक्ट सणांवर कसा आहे, तसेच 'अनलॉकिंग'नंतर कोरोनामुळे पर्यटनावर काय परिणाम झाला आहे? ह्याचा आढावा घेणायचा प्रयत्न ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी केला. त्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीची निवड केली.

सर्वसामान्य मुंबईकर पूर्वपदावर

कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा जुहू बीच अक्षरश: वैराण झाला होता. जुहू चौपाटी बीच लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि तिथे मुले खेळत व फिरत असत. दिवसभर येथे पर्यटकांचा ओघ सुरू असतो. परंतु, कोरोना संसर्ग पसरण्याच्या भीतीने लोक येथे येण्यास घाबरत होते. परंतु, आता लोकांचा मनातून भीती कमी झाली असून योग्य ती काळजी घेऊन सर्वसामान्य मुंबईकर पूर्वपदावर येत आहेत आणि त्यात दिवाळी सणामुळे त्यांच्या आनंदात भर पडली आहे.

जी कथा पर्यटकांची तिच कथा जुहू बीचवर छोटेखानी ठेला चालवणारे ठेलाचालकांची, कोरोनाने त्यांचे जीवन पण हैराण केले. फैयज यांचे जुहू बीचवर फास्ट फूडचे दुकान आहे. या दोन महिन्यांत ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. कुटुंबात 4 लोक आहेत. गेल्या 34 वर्षांपासून हा उद्योग असाच सुरू होता. परंतु, लॉकडाउनने तो मोडला अनलॉक सुरू झाले, पण कोरोना इफेक्ट असा की सर्व सामान्य जनता अजूनही डिस्टनसिंग करत आहे. आता मुंबई अनलॉक झाली आहे, पण तरीही व्यवसाय जणू कुलूपबंद आहे. दुकान चालवण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे दुकान चालवणे तोट्याचे ठरत असल्याचे फैयाज सांगतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.