मुंबई - महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत वांद्रे पूर्व येथील एम. आय. जी क्रिकेट क्लब येथे बैठक बोलावली आहे. (MNS meeting with office bearers at Bandra) या बैठकीला अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे पहिल्या फळीतील नेते उपस्थित असणार आहेत.
राज ठाकरे आपल्या भाषणात काय बोलणार?
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजल्यापासून बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीनंतर राज ठाकरे एमआयजी क्लबमध्ये मनसैनिकांना संबोधित करतील. त्यावेळी राज ठाकरे आपल्या भाषणात काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
हेही वाचा -लोकसभेसह राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज चर्चा; राहुल गांधी सरकारला घेरणार