ETV Bharat / city

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातून निर्माण होणार 8 हजार 120 घर, म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांची माहिती

author img

By

Published : Aug 1, 2021, 5:56 PM IST

बीडीडी चाळवाशियांना घर मिळणार आहेत. तसेच, ही घरे सोडतीसाठीही उपलब्ध होणार आहेत. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींतील १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर, दुसरीकडे म्हाडाला लॉटरीसाठी ८ हजार १२० घरे उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती, म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली आहे.

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातून निर्माण होणार 8 हजार 120 घर, म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांची माहिती
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातून निर्माण होणार 8 हजार 120 घर, म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांची माहिती

मुंबई - बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर आज सुरवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्वसन इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पातून फक्त बीडीडी चाळवाशियांना घर मिळणार आहेत. तसेच, ही घरे सोडतीसाठीही उपलब्ध होणार आहेत. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींतील १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर, दुसरीकडे म्हाडाला लॉटरीसाठी ८ हजार १२० घरे उपलब्ध होणार आहेत. याबाबत म्हाडा मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर आज सुरवात झाली. म्हाडाला लॉटरीसाठी ८ हजार १२० घरे उपलब्ध होणार आहेत. याबाबत म्हाडा मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी-

'सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण'

सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे काम म्हाडा अनेक वर्षांपासून करत आहे. मात्र, भूखंड नसल्याने मोठ्या संख्येने म्हाडाच्या वसाहती तयार होत नाहीत. यामुळे मोठ्या संख्येने सोडत निघत नाही. मात्र, वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही देणार आहे. कारण या प्रकल्पातून पुढील काही वर्षात 8000 पेक्षा जास्त घर लॉटरीसाठी उपलब्ध होणार आहेत. लवकरच नायगाव आणि ना. म. जोशी येथील कामालाही सुरुवात केली जाणार असल्याची माहितीही यावेळी समोर आली आहे. या तिन्ही ठिकाणच्या प्रकल्पांतून मुंबई मंडळाला आठ हजार १२० घरे सोडतीसाठी मिळणार असून, ही घरे मध्यम आणि उच्च गटातील असतील, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली आहे.

'कुठे-किती घरे विक्री साठी होणार उपलब्ध'

वरळी - मध्यम गटासाठी ७५० चौ. फुटांची ३२२४ घरे. उच्च गटासाठी १००० चौ. फुटांची १७७२ घरे. नायगाव - मध्यम गटासाठी ८०० चौ. फुटांची १४०८ घरे. उच्च गटासाठी १००० चौ. फुटांची ४४८ घरे. ना. म. जोशी - मध्यम गटासाठी ७५० चौ. फुटांची ७२८ घरे. तर, उच्च गटासाठी अंदाजे ९५० चौ. फुटांची ५४० घरे. ४७ मजली २ इमारती. वरळी आणि नायगाव येथे साठ माळ्याच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. तर, ना. म. जोशी- मार्ग येथे ४७ मजली २ इमारती विक्रीसाठी बांधण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.