मुंबई - ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायती यांच्या निवडणुका ( nagparishad and nagarpanchayat election ) पुढे ढकलण्यात याव्या याबाबत आज ( 11 जुलै ) भाजप शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांची भेट घेत घेतली. त्यात दुसरीकडे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड ( obc leader haribhau rathod ) यांनी सुद्धा निवडणूक आयुक्तांची ( Elections commission ) भेट घेऊन राज्यात पावसाळ्याचा मुद्दा विचारात घेऊन या निवडणुका किमान दोन महिने पुढे ढकलव्यात, अशी विनंती केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात जोर लावायला हवा? - राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांची भेट घेतल्यानंतर हरिभाऊ राठोड म्हणाले की, ऑक्टोंबरपर्यंत वाढवून द्यावी असा आम्ही त्यांना सांगितलं. परंतु, आम्हाला तशी परवानगी देण्यात आलेली नाही. म्हणून आज माझ्या सहित भाजपचे शिष्टमंडळ सुद्धा निवडणूक आयोगाला भेटत आहे. त्याचा काही उपयोग होणार नसल्याचं हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं आहे. वास्तविक हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातच निकाली लागू शकतो. म्हणून मी यापूर्वी सांगितल आहे की आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जोर लावायला हवा.
ओबीसी आरक्षणावर राजकीय पक्ष गंभीर नाहीत? - ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत हे सर्वच पक्षांचे मत असलं, तरीसुद्धा हा फक्त एक देखावा आहे. मग ते कुठलेही पक्ष असू देत. या अगोदर हे पक्ष झोपले होते का? असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जनसंख्या करायला तुम्ही घाबरता का? असं सांगत बांठीया आयोगाची जनसंख्या चुकीची असल्याचही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. हे राजकारणी फक्त दाखवण्यासाठी एक दाखवत आहेत, परंतु यांना स्वतःला ओबीसी आरक्षण नको आहे, असा आरोपही हरिभाऊ राठोड यांनी लगावला आहे.
हेही वाचा - Shivsena : शिवसेनेची 'धनुष्यबाणा'बाबत निवडणूक आयोगाकडे धाव; 'आमची बाजू ऐकून घ्यावी, मगच...'