ETV Bharat / city

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा मुंबई काँग्रेसचा नारा? - महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा कल हा स्वतंत्र निवडणुका लढवण्याकडे असल्याचे म्हटले आहे.

bmc
मुंबई पालिका इमारत
author img

By

Published : Jun 19, 2021, 9:12 PM IST

Updated : Jun 19, 2021, 10:46 PM IST

मुंबई - राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वतंत्रपणे लढवल्या जाव्यात असा सूर मुंबई काँग्रेसमधून उमठत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील

मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढवणार?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील काँग्रेस कार्यालयामध्ये 51 कुपोषित बालकांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळेस महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा कल हा स्वतंत्र निवडणुका लढवण्याकडे असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव हा मुंबई काँग्रेसकडून देण्यात आलेला असून, हा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर चर्चेला घेऊन आपण त्यावर निर्णय घेऊ, असं महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेत असे आहे पक्षीय बलाबल-

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 जागांसाठी निवडणूक लढवली जाते. सध्याच्या घडीला मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाचे 97 नगरसेवक असून भाजपचे 82, काँग्रेस पक्षाचे 30 नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9, समाजवादी पार्टीचे 6 तर एमआयएमचे 2 तर मनसेचा एकमात्र नगरसेवक असे चित्र आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी ही शिवसेनेकडे आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या कलगीतुरा सुरू असताना मुंबई काँग्रेसकडून आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही स्वतंत्ररित्या लढवली जावी, अशी मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली जात असल्याने यासंदर्भात लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.

Last Updated : Jun 19, 2021, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.