ETV Bharat / city

Rajya Sabha Election : अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांशी संपर्क साधून मतदानाची विनंती करणार - नाना पटोले - लहान पक्षाच्या आमदारांची नाराजी दूर करणार

राज्यसभेसाठी ( Rajya Sabha Election 2022 ) प्रत्येक अपक्ष आणि लहान पक्षाच्या ( Independent MLA ) आमदारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) उमेदवाराला मतदान करावे, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी दिली आहे.

Nana Patole
Nana Patole
author img

By

Published : Jun 7, 2022, 3:47 PM IST

मुंबई - राज्यसभा ( Rajya Sabha Election 2022 ) निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून, प्रत्येक अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावे, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काही नाराज अपक्ष आमदार आहेत. त्यांनी मतदानापूर्वी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी नाराजी व्यक्त करणे यात काहीही गैर नाही. आपल्या मतदारसंघातील कामांसाठी याबाबतची नाराज आमदारांनी व्यक्त केली असून, अपक्ष तसेच लहान पक्षाच्या आमदारांची नाराजी ( Independent MLA ) दूर करण्याबाबत आज ( मंगळवारी ) महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच ती नाराजी लवकरात लवकर दूर व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना काँग्रेस विनंती करेल, अशी माहिती नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी दिली आहे.

'समाजवादी पक्षाशी काँग्रेस संपर्क साधणार' : महाविकास आघाडी सरकारमध्ये असणारे लहान पक्ष मोठ्या पक्षाशी संलग्न आहेत. समाजवादी पक्ष हा काँग्रेसच्या जवळचा पक्ष आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावे, यासाठी काँग्रेसकडून समाजवादी पक्षाचे संपर्क साधला जाणार आहे. तसेच एमआयएम पक्षसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संबंध असून त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क साधेल, असेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितला आहे. सगळ्यांनाच प्रत्येक अपेक्षा आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना संपर्क केला जात आहे. संपर्क साधून त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती केली जाणार आहे.

'काँग्रेसचे आमदार दोन दिवस मुंबईत थांबणार' : आमदारांना मतदानाच्या प्रशिक्षणाची गरज नाही. मात्र मतदान कसे करावे याबाबत काही सूचना नक्कीच केल्या जाणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार मुंबईतच दोन दिवस राहणार आहेत. मात्र सध्या आपल्या निवासस्थानी हे आमदार राहणार आहेत. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यासंदर्भात अद्याप काँग्रेसने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसेच विधानपरिषद उमेदवारीबाबत काँग्रेस उद्या निर्णय घेणार असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Abu Azmi about RS Election Support : महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले; राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी तटस्थ राहण्याची भूमिकेत - अबू आझमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.