ETV Bharat / city

अहंकार बाजूला ठेवा.. काँग्रेस हाच पर्याय, काँग्रेसचा ममता बॅनर्जींवर पलटवार - ममता बॅनर्जींचे तिसऱ्या आघाडीचे संकेत

एकाच राज्यात सत्तेवर असलेला पक्ष संपूर्ण देशाला कसा काय पर्याय ठरू शकतो याचे उत्तर आणि ममता बॅनर्जी यांनी द्यावं. काँग्रेस पक्ष हा गेल्या दीडशे वर्षांपासून तळागाळात पाळंमुळं रुजलेला पक्ष आहे. काँग्रेसला देशभरात मान्यता आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee on congress) यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.

Congress reaction on Mamata
Congress reaction on Mamata
author img

By

Published : Dec 1, 2021, 7:30 PM IST

Updated : Dec 1, 2021, 8:05 PM IST

मुंबई - यूपीए-2 आता कुठे अस्तित्वात आहे, असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee on congress) यांनी आज मुंबईत शरद पवार यांच्या भेटीनंतर उपस्थित केला. ममता बॅनर्जी यांच्या या विधानाला काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

एकाच राज्यात सत्तेवर असलेला पक्ष संपूर्ण देशाला कसा काय पर्याय ठरू शकतो याचे उत्तर आणि ममता बॅनर्जी यांनी द्यावं. काँग्रेस पक्ष हा गेल्या दीडशे वर्षांपासून तळागाळात पाळंमुळं रुजलेला पक्ष आहे. काँग्रेसला देशभरात मान्यता आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपच्या विरोधात सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. मात्र, आता यूपीए-२ कुठे शिल्लक आहे. काँग्रेस हा पर्याय ठरू शकत नाही, अशी परखड प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली होती. या प्रतिक्रियेनंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

अहंकार बाजूला ठेवा -

भाजपाच्या विरोधात जर काही करायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवून एकत्र यावं आणि काँग्रेस शिवाय कुठलाही पर्याय नाही हे समजून घ्यावं, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली आहे.

ममता बॅनर्जीची काँग्रेसवर उघड नाराजी

2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातून भारतीय जनता पक्षाला सत्ता उत्तर करायचा असेल तर देशातील सर्व प्रादेशिक पक्षाने एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी बैठकीत मुद्दा उपस्थित केला. तसेच विरोधी पक्षात असूनही काँग्रेस आपली भूमिका चोख बजावत नसल्याचं बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी खंत व्यक्त केली. केंद्र सरकारच्या विरोधात लढण्यासाठी एक मजबूत पर्याय उभा करणे गरजेचे आहे. मात्र जे विरोधात आहेत ते केंद्र सरकारची लढायलाच तयार नाहीत असं नाव न घेता काँग्रेसला टोलाही यावेळी ममता बॅनर्जी यांनी लगावला. तसेच देशात मोदींचे सरकार आल्यानंतर फॅसिझम सुरू झाल्या असून त्या विरोधात सर्वांनी उभ राहिलं पाहिजे. यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी तिसरी आघाडी निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच या तिसऱ्या आघाडीचा नेमकं नेतृत्व कोण करणार याबाबत आम्ही पुढे चर्चा करून करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शरद पवार हे देशातले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केली असल्याचेही यावेळी ममता बॅनर्जी यांनी.

Last Updated : Dec 1, 2021, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.