मुंबई : वाढती महागाई, बेरोजगारी, मोदी सरकारची दडपशाही याच्या विरोधामध्ये आज काँग्रेसने (Congress leaders were prevented from agitating) देशभर मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन (Agitation against the government) पुकारले. मुंबईत सुद्धा राज भवनला घेराव घालण्यासाठी (Siege of Raj Bhavan in Mumbai) काँग्रेसच्या नेत्यांनी आज आंदोलन पुकारले होते. परंतु पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना 149 ची नोटीस (Police gave 149 notices) देऊन, राजभवन मध्येच रोखले.
काँग्रेस नेते राजभवन वर देणार होते धडक? : 'मागील 70 वर्षात काँग्रेसने जे कमावले होते; ते मोदी सरकारने आठ वर्षात गमावले', अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली. वाढती महागाई, बेरोजगारी व विविध सरकारी यंत्रणांकडून विरोधकांवर होणारी दडपशाही याच्या विरोधात आज काँग्रेसकडून देशभर आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात, मुंबई सुद्धा राजभवनला घेराव घालण्याच्या तयारीत काँग्रेस होती. मुंबईतील हँगिंग गार्डन ते राज भवन असे काँग्रेसने आंदोलन पुकारले होते. परंतु काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी राजभवन मध्येच अडकवले.
आंदोलन स्थळी जाण्यास नकार : सकाळी साडेअकरा वाजता काँग्रेसचे हँगिंग गार्डन ते राजभवन असे आंदोलन होणार होते. याच्या पूर्व तयारीसाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक राजभवन मध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान हे सर्व नेते उपस्थित होते. परंतु या बैठकीनंतर आंदोलनासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी राजभवनातून आंदोलन स्थळी जाण्यास नकार दिला व त्यांना तेथेच अडून ठेवले.
आता आम्हाला फक्त देशद्रोही ठरवण्याचे बाकी राहिले : यासंदर्भात काँग्रेसच्या अनेक नेत्यांना 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आहे. आम्हाला लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. तर आता सरकारने आम्हाला देशद्रोही घोषित करावे व आमच्यावर खटले चालवावे एवढेच बाकी राहिल आहे; असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.