ETV Bharat / city

Nana Patole On CM Eknath Shinde : गुवाहाटीतील महाशक्तीचा मुख्यमंत्र्यांवर प्रभाव; नाना पटोले यांचा घणाघात - दोन दिवशीय विशेष अधिवेशन

राज्य विधानसभेचे दोन दिवशीय विशेष अधिवेशन ( Assembly Session 2022 ) झाले. दुसऱ्या दिवशी सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुवाहाटीतील महाशक्तीचा प्रभाव पडल्याचा घणाघात केला. ( Nana Patole On CM Eknath Shinde )

Nana Patole On CM Eknath Shinde
नाना पटोले
author img

By

Published : Jul 4, 2022, 10:25 PM IST

मुंबई - शिंदे सरकारने आज बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. महाशक्तीचा यावेळी उल्लेख करत मोदीं विरोधात बोलणाऱ्या काँग्रेसच्या स्थितीकडे बोट दाखवले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुवाहाटीतील महाशक्तीचा प्रभाव पडल्याचा घणाघात केला. ( Nana Patole On CM Eknath Shinde )

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

महाशक्ती आमच्या पाठीशी उभी - एकनाथ शिंदे यांनी क राज्य विधानसभेचे दोन दिवशीय विशेष अधिवेशन ( Assembly Session 2022 ) झाले. दुसऱ्या दिवशी सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाशक्ती आमच्या पाठीशी उभी आहे. आजवर ज्यांनी ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले, ते धुळीस मिळाले. काँग्रेसची परिस्थिती सध्या देशात बिकट असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे अंगुली निर्देश केले.

गुवाहाटीच्या महाशक्तीचा प्रभाव - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जोरदार कानपिचक्या दिल्या. सोबत असताना नवनिर्वाचित मुख्यमंत्री भाजपवर आरोप करत होते. आज सत्तेत बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे गोडवे गात आहेत. तसेच ज्या महाशक्तीचा मुख्यमंत्री उल्लेख करत आहेत त्या गुवाहाटीचा प्रभाव मुख्यमंत्र्यांना झाल्याचे दिसून येतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाशक्तीचा अर्थ भारत माता की जय असा केला होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या महाशक्तीचा अर्थ वेगळा असल्याचेही पटोले म्हणाले.

जनतेला आश्वासित केलेले प्रश्न सुटावेत - मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे आणि राज्यातील जनतेला अश्वाशित केले. त्या सर्वांची अंमलबजावणी व्हायला हवी. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आदींचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत असेही पटोले यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार पडल्यामुळे आता काँग्रेस विरोधकाची भूमिका नक्की निभवणार, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

सभागृहात येऊ दिले नाही - सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव मांडल्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर राहिले, याबाबत पटोले यांना छेडले असता, बहुमत चाचणी असल्याने आज सर्वांनी वेळेत यायला हवे होते. काही जण वाहतूक कोंडीत अडकले. तर विधानभवनाच्या लॉबीमध्ये आलेल्या काही आमदारांना सभागृहात येऊ दिलं नाही असा आरोप पटोले यांनी केला.

हेही वाचा - CM On VAT Of Petrol : जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करु - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.